आईच्या दुसऱ्या लग्नाची बातमी समजताच दलजित कौरच्...

आईच्या दुसऱ्या लग्नाची बातमी समजताच दलजित कौरच्या मुलाने दिली अशी प्रतिक्रिया (Son’s Reaction was Like This After Hearing News of Daljiet Kaur Marriage, Said This After Meeting Nikhil Patel)

‘छोटी सरदारनी’ सोबतच अनेक टीव्ही मालिकांमध्ये दिसलेली छोट्या पडद्यावरील अभिनेत्री दलजीत कौर मार्चमध्ये दुसऱ्यांदा बोहल्यावर आहे. नुकतेच  अभिनेत्रीने यूके स्थित बिझनेसमन निखिल पटेलशी साखरपुडा केला होता. माजी पती शालीन भनोतशी घटस्फोट घेतल्यानंतर दिलजीतला पुन्हा प्रेमात पडणे सोपे नव्हते, पण आता ती पुन्हा लग्न करून सेटल होणार आहे. जेव्हा तिने तिचा मुलगा जेडेनला आपल्या लग्नाबद्दल सांगितले तेव्हा त्याने कशी प्रतिक्रिया दिली याबद्दल अलीकडेच एका मुलाखतीत तिने खुलासा केला. यासोबतच तिने आपल्या मुलाची निखिल पटेलशी ओळख करून दिली तेव्हा तो काय बोलला हे देखील सांगितले.

दलजीत कौर काही दिवसात निखिल पटेलसोबत लग्न करणार आहे, निखिल पटेलला आधीपासूनच दोन मुलीसुद्धा आहेत. लग्नानंतर दलजीत केनियाला शिफ्ट होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. एका मुलाखतीत दलजीतने सांगितले की, जेव्हा मी माझ्या मुलाची जेडेनची निखिलशी ओळख करून दिली तेव्हा त्याने आपोआपच त्याला पप्पा म्हटले. निखिलने त्याला पितृत्वाची भावना दिली, ज्यामुळे तो त्याला पप्पा म्हणण्यापासून रोखू शकला नाही.

निखिलच्या आधीही ती अनेकांना भेटली होती, परंतु तिचा मुलगा जेडेनला पितृत्वाची भावना देऊ शकेल असा कोणीही तिला सापडला नाही. मात्र, निखिलला भेटल्यानंतर तिच्या मुलाला एक वेगळाच कम्फर्ट झोन मिळाला आणि पहिल्याच भेटीत मुलाने निखिलला पप्पा म्हटले. आपल्या मुलाचे निखिलसोबतचे बाँडिंग पाहून अभिनेत्रीच्या आनंदाला पारावार उरला नाही.

दलजीतने पुढे सांगितले की जेडेन केनियाला शिफ्ट होण्यासाठी खूप उत्सुक आहे, तो सर्वांना सांगतो की त्याचे एक वडील आहेत ज्यांच्यासोबत तो केनियाला शिफ्ट होणार आहे, परंतु त्याला हे देखील माहित आहे की त्याचे दुसरे वडील  शालीन भानोट आहेत. आता तो त्याच्या वडिलांकडे राहणार आहे, जे त्याला शाळेत सोडायला आणि न्यायला येतील. याशिवाय आई जेव्हा कामात असेल तेव्हा घरी त्याची काळजी घेण्यासाठी कोणीतरी असेल, त्यामुळे तो खूप आनंदी आहे.

अभिनेत्रीच्या म्हणण्यानुसार, तिला तिचा मुलगा जेडेनसाठी सर्व काही ठीक करायचे आहे, परंतु ती केवळ तिच्या मुलासाठी लग्न करत नाही. ती म्हणते की जर तिचा नवरा फक्त चांगला पिता असेल तर ते लग्न देखील अयशस्वी होईल आणि जर तो एक चांगला जोडीदार बनला पण चांगला वडील नाही तर तेसुद्धा लग्न देखील अयशस्वी होईल. मला प्रेमळ आणि आश्वासक पतीची गरज आहे.

दलजीत कौरने 2009 मध्ये टीव्ही अभिनेता शालीन भनोतसोबत लग्न केले. लग्नानंतर काही वर्षांपर्यंत त्यांचे नाते चांगले होते, पण नंतर त्यांच्या नात्यात कटुता वाढू लागली. दलजीतने तिच्या पतीवर घरगुती हिंसाचार आणि हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप केला, त्यानंतर दीर्घ कायदेशीर लढाईनंतर 2015 मध्ये या जोडप्याचा घटस्फोट झाला.