आलियाच्या डोहाळे जेवणाला कोण कोण येणार पाहुणे? ...

आलियाच्या डोहाळे जेवणाला कोण कोण येणार पाहुणे? (Soni Razdan, Neetu Kapoor will reportedly host baby shower for Alia Bhatt)

आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांनी एप्रिल २०२२ मध्ये लग्न केले आणि त्यानंतर लगेचच गरोदर असल्याची बातमी देऊन त्यांनी चाहत्यांना चकीत केले होते. आता लवकरच हे क्युट जोडपं आई-बाबा होणार आहेत. त्यामुळे कपूर खानदानामध्ये आनंदाचे वातावरण आहे आणि आलियाच्या डोहाळेजेवणाची तयारी सुरू आहे. सोशल मीडियानुसार या सोहळ्याचे नियोजन आलिया भट्टची आई सोनी राजदान (Soni Rajdan) आणि सासू नीतू कपूर करत असल्याचे वृत्त आहे. आणि (Neetu Kapoor) करत असल्याचे समजते. यावेळी दोन्ही आजींचा उत्साह ओसंडून वाहताना दिसतोय.

अजून डोहाळे जेवणाची तारीख फायनल झालेली नाही. या महिन्याच्या शेवटी एक चांगलासा मुहूर्त पाहून हा सोहळा पार पाडण्याचे योजले जात आहे. कपूर आणि भट्ट कुटुंब आलियाच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाची तयारी करत आहेत. विशेष म्हणजे आलियाच्या डोहाळे जेवणाच्या या कार्यक्रमात केवळ महिलांचा सहभाग असणार आहे.

आलियाचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम हा मुंबईत होणार आहे. मात्र अभिनेत्री आलियाचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम हा तिच्या लग्नाप्रमाणे घरी अथवा बाहेर होईल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अलीकडेच आलियाच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमातील पाहुण्यांची नावे देखील समोर आली आहेत. माहितीनुसार, शाहीन भट्ट, रणबीरच्या बहिणी करीना कपूर खान, करिश्मा कपूर, आकांक्षा रंजन सिंग, नव्या नंदा, श्वेता बच्चन, आरती शेट्टी यांच्यासह तिच्या बालपणीच्या मैत्रिणी आलियाच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

Ranbir Kapoor-Alia Bhatt wedding: Here are a few hints that their wedding  arrangements have begun

वर्कफ्रंटविषयी बोलायचे तर, नुकताच रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे. जो बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने ५ दिवसांत १५० कोटींहून अधिक गल्ला जमवला आहे. चित्रपटातील आलिया भट्ट आणि रणबीर कपूरची केमिस्ट्री प्रेक्षकांना भावते आहे. बहुधा याच चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी नीतू थांबली असावी. आता ती या सोहळ्याच्या जय्यद तयारीला लागली आहे.