लेकीच्या गरोदरपणामुळे अनिल कपूर यांचे झाले हाल....

लेकीच्या गरोदरपणामुळे अनिल कपूर यांचे झाले हाल..(Sonam Kapoor’s Pregnancy Has Made Anil Kapoor anxious )

अभिनेता अनिल कपूरकडे सध्या खूप आनंदी वातावरण आहे. विशेष म्हणजे त्याला दोन कारणे आहेत. एक म्हणजे त्यांचा  ‘जुग जुग जिओ’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे तर दुसरे कारण म्हणजे ते लवकरच आजोबा बनणार आहेत. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री सोनम कपूरने एक फोटो शेअर करुन ती गरोदर असल्याची बातमी सर्वांना दिली.

अलीकडेच लंडनमध्ये सोनम कपूरचे डोहाळे जेवण पार पडले.  या डोहाळे जेवणाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. फोटोंमध्ये सोनमच्या चेहऱ्यावर आलेले गरोदरपणातील तेज स्पष्टपणे दिसत होते. सोनमचा नवरा आनंद आहुजासुद्धा आपल्या बिझनेस आणि बिझी शेड्युलमधून वेळ काढून बायकोची विशेष काळजी घेत आहे.  सोनम आणि तिच्या घरातील सर्व मंडळी येणाऱ्या छोट्या पाहुण्याच्या आगमनाची जोरदार तयारी करत आहेत.

एकीकडे सोनम कपूरचा पती आनंद आहुजा आणि तिच्या घरातील मंडळी छोट्या पाहुण्याच्या आगमनाच्या तयारीत व्यस्त आहेत. तर दुसरीकडे सोनमचे वडील अनिल कपूर यांनी तर छोट्या पाहुण्याच्या आगमनाच्या आनंदात घराचे रूपच बदलले आहे.  लवकरच प्रदर्शित होणार्‍या जुग जुग जिओ चित्रपटाच्या प्रमोशनल मुलाखतीदरम्यान मीडियाने अनिल कपूरला सोनम कपूरच्या गरोदरपणाबद्दल आणि येणाऱ्या पाहुण्याच्या तयारीबद्दल विचारले तेव्हा त्यांनी याबाबत खुलासा केला.

आजोबा होण्याच्या प्रश्नावर अनिल कपूर म्हणाले की,” खरं सांगू तर मी थोडा घाबरलो आहे. मला फक्त सर्व काही ठीक व्हावे आणि सर्व काही चांगले व्हावे अशी इच्छा आहे.  मी तुम्हाला माझ्या भावना आता शब्दात सांगू शकत नाही.”  अनिल कपूर पुढे म्हणाले, सुनीता आतापासूनच येणाऱ्या लहान पाहुण्याच्या आगमनाच्या तयारीत व्यस्त आहे आणि तिने घराचा संपूर्ण कायापालट केला आहे.

घरात कोणते बदल केले आहेत या प्रश्नावर अनिल यांनी सांगितले की, सध्या मला कुठे बसावं हे शोधावं लागतं, कुठल्याही रुममध्ये गेल्यावर ही रुम सोनमची, ती रुम आनंदची असे म्हणत सुनीता मला अडवत असते. कुठे बसायला गेलो तरी इथे बसू नको तिथे बस असं सारखं म्हणत असते. सुनीताने संपूर्ण घरच बदलून टाकले असल्याचे अनिल कपूर यांनी सांगितले.