सोनम कपूरचा नवरा इतका श्रीमंत आहे की, त्याची सं...

सोनम कपूरचा नवरा इतका श्रीमंत आहे की, त्याची संपत्ती पाहून तुम्ही थक्क व्हाल! (Sonam Kapoor’s Husband Is The Owner Of Huge Property)

कालच सोनम कपूर बाळंत झाली. तिला मुलगा झाला. ही बातमी स्वतः सोनम आणि तिचा नवरा आनंद आहुजा यांनी सोशल मीडियावरून प्रसारित केली. तिचा नवरा आनंद हा बॉलिवूडशी संबंधित नाही. म्हणून तो प्रसिद्धीच्या झोतात नसतो. तो इतका श्रीमंत आहे की, त्याची संपत्ती पाहून तुम्ही थक्क व्हाल!

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

सोनम आणि आनंद हे लग्नाआधी बरीच वर्षे एकमेकांना डेट करत होते. त्यांची पहिली भेट ‘प्रेम रतन धन पायो’ या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान झाली होती. नंतर महिन्याभरातच आनंदने सोनमला मागणी घातली होती. थोड्याच दिवसांनी सोनमने त्याला होकार दिला. २०१८ मध्ये त्यांनी लग्न केलं. त्यांचा विवाह सोहळा शानदार झाला होता.

आनंद हा उद्योगपती आहे. शाही एक्सपोर्ट या निर्यात करणाऱ्या कंपनीचे मालक हरीश आहुजा यांचा हा मुलगा. सदर कंपनीचा तो मॅनेजिंग डायरेक्टर आहे. एका वृत्तानुसार आनंदची एकूण मिळकत ४५० मिलियन डॉलर्स इतकी आहे. ‘भाने’ नावाचा त्याचा ब्रॅण्ड देश-विदेशात चांगलाच लोकप्रिय आहे. एका मल्टी ब्रॅण्ड पादत्राणे कंपनीचा पण तो मालक आहे. त्याचे सुरुवातीचे शिक्षण दिल्लीत झाले. नंतर त्याने अमेरिकेतून पदवी घेतली. त्यानंतर त्याने व्हार्टन युनिव्हर्सिटीतून एम.बी.ए. केले आहे. ही पदवी मिळवल्यावर आनंदने ॲमेझॉन कंपनीत प्रॉडक्ट मॅनेजर म्हणून उमेदवारी केली. तो सोनम सह, जास्त करून परदेशात राहतो.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

लग्नानंतर ४ वर्षांनी, म्हणजे काल तिला मुलगा झाला. सोशल मीडियावरून या दोघांनी दिवस गेल्याची बातमी चाहत्यांसाठी प्रसारित केली होती. तेव्हा त्यांचे चाहते व बॉलिवूडच्या मान्यवरांनी या जोडप्याला शुभेच्छा दिल्या होत्या.