सोनम कपूरने विकले मुंबईतील अलिशान अपार्टमेंट, अ...

सोनम कपूरने विकले मुंबईतील अलिशान अपार्टमेंट, अभिनेत्रीला झाला इतका फायदा (Sonam Kapoor Sells Luxury Mumbai Home For Rs 32.5 Crore)

एकेकाळी फॅशन सेन्स, स्टाइल, प्रेग्नेंसी यामुळे चर्चेत असलेली सोनम कपूर पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. सोनम कपूरने मुंबईतील बीकेसी येथील प्राइम एरियामध्ये असलेले आलिशान घर विकल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. अभिनेत्रीचे हे घर सिग्नेचर आयलंडमध्ये होते. सोनमने हे आलिशान घर SMF इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडला विकले आहे.

सोनमने आपले आलिशान घर 32.5 कोटींना विकल्याचीही माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. अभिनेत्रीने 2015 मध्ये हा आलिशान फ्लॅट खरेदी केला होता. त्यावेळी ते घर 31.48 कोटी रुपयांना खरेदी केले होते. आणि आता 7 वर्षांनंतर हा फ्लॅट विकल्यावर सोनमला 1 कोटींहून अधिक नफा झाला आहे. इतकेच नाही तर ज्या व्यक्तीने सोनम कपूरचा हा फ्लॅट घेतला आहे, त्यांनी स्टॅम्प ड्युटी म्हणून १.९५ कोटी रुपये खर्च केले आहेत.

IndexTap.com या रिअल इस्टेट अॅडव्हायझरी फर्मच्या मते, तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅटचा बिल्ट अप एरिया ५,५३३ स्क्वेअर फूट आहे. जो विक्री आणि हस्तांतरण करारामध्ये देखील दर्शविला आहे. प्रसिद्ध वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्सजवळ असलेल्या फ्लॅटमध्ये चार पार्किंग स्लॉट असल्याचेही अहवालात लिहिले आहे. या अपार्टमेंटची विक्री करण्यासाठी कागदपत्र २९ डिसेंबर २०२२ रोजी नोंदवले गेले.

ETimes च्या रिपोर्टनुसार, सोनम कपूरने जून 2015 मध्ये वरुण सिंहकडून मुंबईत हे आलिशान घर विकत घेतले होते. वरुण सिंग हे Squarefeet चे संस्थापक आहेत. ETimes शी बोलताना वरुण सिंह यांनी सांगितले की, आलिशान अपार्टमेंट असलेली ही इमारत मुंबईच्या प्राइम लोकेशनमध्ये आहे. प्राइम लोकेशनमुळे या अपार्टमेंटला मागणी खूप आहे.