गडद लाल ड्रेस मध्ये सोनम कप...

गडद लाल ड्रेस मध्ये सोनम कपूरची मदमस्त अदा पाहून चाहते झाले फिदा (Sonam Kapoor Raises Internet Mercury With Bold Avtar : Fans Are Stunned To See Her Beauty)

सोनम कपूरच्या अभिनयाबरोबरच तिच्या फॅशन सेन्सची देखील लोक तारीफ करत असतात. त्यामुळे तिला फॅशनिस्टा म्हणून ओळखले जाते. फॅशनेबल ड्रेसेसचे आपले फोटो ती अधून मधून सोशल साइटवर टाकत असते. नुकतेच तिने आपले नवे फॅशनेबल फोटो प्रसिद्ध केले आहेत.

Sonam Kapoor, Bold Avtar

फोटो सौजन्य : इंस्टाग्राम
सोनम कपूरचे हे झकास फोटो सोशल साईट्सवर वेगाने पसरत आहेत. या फोटोत तिची अदा अतिशय मोहक आहे. चाहत्यांना मोहात पडणारी आहे.

Sonam Kapoor, Bold Avtar

आपल्या इंस्टाग्राम हँडलवर सोनमने ताजे फोटोशूट प्रसिद्ध केले आहे. त्यात ती लाल गडद रंगाचा बॅकलेस फ्रॉक घालून लक्ष वेधून घेत आहे. तिचा हा सुंदर फ्रॉक आकर्षक डिझाईनचा आहे. त्यावर तिने काळे हाय बूट्स घातले आहेत.

Sonam Kapoor, Bold Avtar

फोटो सौजन्य : इंस्टाग्राम
गडद लाल रंगाच्या या फ्रॉकला शोभेल अशी लाल रंगाची स्लिंग बॅग तिने हातात ठेवली आहे. न्यूड मेकअपमुळे तिच्या सौंदर्यात अधिकच भर पडली आहे.

Sonam Kapoor, Bold Avtar

फोटो सौजन्य : इंस्टाग्राम
सोनमच्या कामकाजाबाबत बोलायचं तर ती अनिल कपूरच्या ‘एके वर्सेस एके’ या वेब सिरीजमध्ये शेवटची दिसली होती. २०१९ साली आलेल्या ‘जोया फॅक्टर’ या सिनेमात ती होती.