गरोदरपणाची गोड बातमी दिल्यानंतर पहिल्यांदाच सोन...

गरोदरपणाची गोड बातमी दिल्यानंतर पहिल्यांदाच सोनम कपूर सार्वजनिक ठिकाणी दिसली…, ब्ल्यू पँट-सूट मध्ये फ्लॉन्ट केले बेबी बंप (Sonam Kapoor makes her First appearance after pregnancy announcement, flaunts baby bump in blue pant-suit)

प्रसिद्ध अभिनेत्री आणि फॅशन आयकॉन सोनम कपूर लवकरच आई होणार आहे. कित्येक दिवसांपासून तिच्या गरोदरपणाबद्दल चर्चा सुरू होत्या. परंतु अलीकडेच तिने नवरा आनंद अहुजाबरोबर इन्स्टाग्रावर फोटो शेअर करत ती लवकरच आई होणार असल्याचं जाहीर केलं असल्याने या चर्चांना विराम मिळाला आहे. तिने दिलेल्या या गोड बातमीमुळे तिचे कुटुंबिय, मित्रपरिवार आणि चाहते सर्वच तिला शुभेच्छा देत आहेत. दरम्यान आपल्या गरोदरपणाची बातमी दिल्यानंतर प्रथमच सोनम सार्वजनिक ठिकाणी दिसून आली, ज्याचे फोटो सोशल मीडियावर भरघोस पसंती दर्शवित आहेत.

गरोदरपणाच्या अनाउसमेंटनंतर काल सोनम कपूर पहिल्यांदा पती आनंद आहुजा आणि वडील अनिल कपूर यांच्यासोबत ‘वेज-नॉनवेज’ या रेस्टॉरंटच्या ओपनिंगसाठी गेलेली दिसली. तेथे व्हाइट कलरचे टी-शर्ट अन्‌ सोबत ब्ल्यू कलरचा सूट – पँट घालून आलेली सोनम बेबी बंपसोबतही अतिशय ग्लॅमरस दिसत होती. खरं तर ब्ल्यू लॉन्ग कोटने आपले वाढलेले पोट लपवण्याचा प्रयत्न करूनही तिचे पोट दिसून येत होते.  

यावेळी सोनम कपूरने कॅमेऱ्यासमोर वेगवेगळ्या पोझ दिल्या. दरम्यान पती आनंद आहुजा देखील तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करताना दिसला. त्याने सोनमला कॅमेऱ्यासमोर किस देखील केले.

सोनमने दोन दिवसांपूर्वीच तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर काही फोटो पोस्ट करून तिच्या गरोदरपणाची बातमी दिली होती. सोबतच तिने बाळाच्या स्वागतासाठी एक सुंदर नोट लिहिली होती. त्यात तिने म्हटलं होतं की – “चार हात… जे तुझे उत्तम संगोपन करतील… दोन हृदये… जी प्रत्येक क्षणी तुझ्यासाठी धडधडतील… एक कुटुंब…. जे तुला सदैव प्रेम आणि आधार देतील… आम्ही तुझ्या स्वागतासाठी उत्सुक आहोत.”

सोनमच्या लग्नाला चार वर्षे झाली आहेत. आता ती चार महिन्यांची गरोदर आहे. ती आई होणार असल्याची बातमी कळल्यापासून संपूर्ण आहुजा कुटुंबिय अतिशय आनंदी आहेत. तसेच सोनम आणि आनंद हे उभयता देखील त्यांच्या बाळासाठी अतिशय उत्सुक आहेत. त्यांनी आपला आनंद सोशल मीडियावर जाहीरपणे व्यक्त केला आहे.