सोनम कपूरने करवा चौथला उपवास केला नाही, पण छान ...

सोनम कपूरने करवा चौथला उपवास केला नाही, पण छान लाल बनारसी लेहंगा घालून साजरा केला सण (Sonam Kapoor looks etherreal as she wears Banarasi Lehenga for Karwa Chauth celebration, Reveals why she never fast for hubby)

काल सर्वसामान्यांनीच नाही तर बॉलिवूड सेलिब्रिटींनीही मोठ्या थाटामाटात करवा चौथ साजरी केली. आज संपूर्ण सोशल मीडिया सेलेब्सच्या करवा चौथ सेलिब्रेशनच्या फोटोंनी भरलेला आहे. सोनम कपूरने करवा चौथ सेलिब्रेशनचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती लाल बनारसी लेहंगा आणि सोळा शृंगार करून खूपच सुंदर दिसत आहे.

अनिल कपूरची पत्नी सुनीता कपूर दरवर्षी त्यांच्या घरी करवा चौथ सेलिब्रेशन पार्टीचे आयोजन करते. या वर्षी देखील त्यांनी घरी कुटुंब आणि मित्रांसाठी करवा चौथच्या भव्य पूजेचे आयोजन केले होते, ज्यामध्ये अनेक बॉलीवूड सेलिब्रिटी एकापेक्षा एक सरस पारंपारिक वेशभुषेत दिसले होते. या करवा चौथ सेलिब्रेशनमध्ये सोनम कपूरही सहभागी झाली होती, ज्याच्या काही झलक तिने इंस्टाग्रामवर शेअर केल्या आहेत. लाल आणि हिरव्या बनारसी लेहेंग्यात सोनम या फोटोंमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

हे फोटो शेअर करत सोनम कपूरने ती करवा चौथचा उपवास का ठेवत नाही हे देखील सांगितले आहे. सोनमने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “माझ्या पतीला करवा चौथचा निर्जल उपवास करणे पसंत नाही कारण त्यांना वाटते की उपवासादरम्यान थोड्या अंतराने अधूनमधून खाणे आवश्यक आहे. म्हणूनच मी करवा चौथचा उपवास कधीच ठेवला नाही. पण आम्ही दोघेही सण आणि परंपरा मानतो.

सोनम कपूर पुढे म्हणाली, “सण आणि परंपरा जपताना कुटुंब आणि मित्रपरिवार जवळ येतात. माझ्या आईला हा सण साजरा करणे आवडते आणि मला त्याचा एक भाग बनणे आणि कपडे घालणे आवडते.”

याशिवाय आपल्या आईने शानदार करवा चौथ पार्टी केल्याबद्दल सोनमने कृतज्ञता व्यक्त केली आहे.

सोनम कपूरच्या या पोस्टवर तिचे पती आनंद आहुजा यांनीही प्रतिक्रिया दिली असून, ‘तू खूप सुंदर दिसत आहेस. ही परंपरा हे एक शक्तिशाली आणि दाहक-विरोधी साधन आहे आणि हा प्रसिद्ध करवा चौथ उत्सव पाहणे खूप छान वाटले.” असे त्याने म्हटले आहे.

सोनम कपूरच्या या पोस्टवर चाहते आणि सेलिब्रिटी खूप प्रेम करत आहेत आणि कमेंट करून सोनमचे कौतुक करत आहेत. सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांचे लग्न २०१८ मध्ये झाले होते. लग्नाच्या चार वर्षानंतर ते नुकतेच एका सुंदर मुलाचे पालक झाले, ज्याचे नाव त्यांनी ‘वायू’ ठेवले आहे.