सोनम कपूरने बेबी बम्प फ्लॉन्ट करत केले क्लासिक ...

सोनम कपूरने बेबी बम्प फ्लॉन्ट करत केले क्लासिक मॅटर्निटी फोटोशूट, फोटो पाहून चाहते झाले थक्क! (Sonam Kapoor Flaunts Her Baby Bump In Latest Photo Shoot)

मागच्याच महिन्यात सोनम कपूरने एका ख़ास अंदाजात आपल्या प्रेग्नेंसीची बातमी दिली होती. त्यानंतर पहिल्यांदाच ती एका कार्यक्रमासाठी बाहेर पडली, ती भेटही खास होती. ब्ल्यू पँटसूटमध्ये त्या कार्यक्रमास हजर राहिलेली सोनम अतिशय स्टायलिश दिसत होती.

स्टाइल दिवा सोनमने आता आपले बेबी बम्प फ्लॉन्ट करत एक खास मॅटर्निटी फोटोशूट करुन घेतलं आहे. तसेच हे फोटो तिने स्वतःच्या इन्स्टा पेजवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये सोनम खरोखर दर्जेदार दिसत आहे. यात ती एखादया सलतनतची राणी असल्यासारखी दिसते आहे.

मेणबत्त्यांचा मंद प्रकाश आणि सोबतच अँटिक पीसची सजावट अशा नयनरम्य वातावरणात सोनमचं सौंदर्य खुलून आलेलं आहे. तिने केसही मोकळे सोडलेले आहेत आणि तिने तिची आई सुनीता कपूरलाही टॅग केले आहे कारण ही साडी तिच्या आईची आहे. सोनमचा मेकअपही अतिशय लाइट आहे आणि डोळे काळेभोर आहेत.

सेलेब्स आणि चाहतेही तिच्या शूटवर जोरदार कमेंट्‌स करत आहेत. एखादं पेटिंग आपण समोर पाहत आहोत असं वाटत असल्याचं ते म्हणत आहेत. सोनमला बहीण रिया कपूरने तयार केले आहे. मागे आपल्या प्रेग्नेंसीबद्दल बोलताना सोनम म्हणाली होती की, ‘बाळंतपण हे बाईसाठी कठीण असतं असं काही सांगतात, तर काही हा अतिशय सुंदर अनुभव असल्याचं सांगतात. पण हा अनुभव नक्कीच आपल्याला अधिक चांगले बनवतो.’