सोनम कपूरला येते ट्रोलर्सची किव (Sonam Kapoor F...

सोनम कपूरला येते ट्रोलर्सची किव (Sonam Kapoor Feels Bad For Trollers, You Will Also Appreciate Knowing Such A Thing)

अनिल कपूर यांची मुलगी आणि बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर आपल्या पतीसोबत लंडनमध्ये राहते. सोनमला इंडस्ट्रीतील फॅशनिस्टा म्हणून ओळखले जाते, मात्र असे असतानाही ट्रोलर्स तिला टार्गेट करतात. ती जे काही घालते, त्याबद्दल अनकेदा बरे-वाईट लिहिले जाते. याआधी सोनम ट्रोलर्सच्या कमेंटमुळे नाराज व्हायची, अनेकदा ती त्यांना रिप्लाय करायची. पण आता अभिनेत्रीला ट्रोलर्सच्या कशाचीच पर्वा वाटत नाही.

अलीकडेच सोनम कपूरने फिल्मफेअरला ती ट्रोलिंग कशी हाताळते ते सांगितले. अभिनेत्री म्हणाली, “मला आता ट्रोलर्ससाठी खूप वाईट वाटते. ते नक्कीच नरकात जातील. इतकेच नाही तर सोनम पुढे म्हणाली की, ‘सोशल मीडियावर केवळ माझीच नाही तर सर्वांचीच विनाकारण बदनामी केली जात आहे. असे काही व्यावसायिक आहेत जे तिथे बसून तुमच्याबद्दल वाईट गोष्टी लिहितात.”

सोनम कपूर म्हणाली, “अशा लोकांचे अस्तित्व फक्त ट्रोलिंगवर अवलंबून असते, त्यामुळे मी ते वैयक्तिकरित्या घेऊ शकत नाही.”

सोनम कपूरने बिझनेसमन आनंद आहुजासोबत लग्न केले. दोघांनी 8 मे 2018 रोजी लग्न केले होते. लग्नापूर्वी दोघेही एकमेकांना डेट करत होते. लग्नानंतर लगेचच एका मुलाखतीदरम्यान अभिनेत्रीने आनंदसोबतची पहिली भेट कशी झाली हे सांगितले होते. सोनमने सांगितले होते की, यापूर्वी तिचे मित्र सोनमला आनंदच्या बेस्ट फ्रेंडसोबत सेट करण्याचा प्रयत्न करत होते. यादरम्यान तिची आनंदशी भेट झाली. ‘प्रेम रतन धन पायो’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान दोघे पहिल्यांदा भेटले होते.

पहिल्या भेटीनंतर आनंद आणि सोनम दोघेही पुन्हा पुन्हा भेटू लागले. सुरुवातीला आनंद देखील सोनमची आपल्या एका मित्रासोबत मैत्री करुन देण्याचा प्रयत्न करत होता, पण नंतर तो स्वतः सोनमच्या प्रेमात पडला आणि दोघेही एकमेकांना डेट करू लागले. अशा प्रकारे सोनम आणि आनंद एकत्र आले. आज दोघेही आपल्या वैवाहिक जीवनात आनंदी आहेत. लग्नानंतर सोनम आनंदसोबत लंडनमध्ये स्थायिक झाली. अभिनेत्रीला भारतापेक्षा लंडन जास्त आवडते.

सोनम म्हणते की, ती लंडनच्या रस्त्यांवर मोकळेपणाने फिरू शकते, तर मुंबईत असे राहणे तिच्यासाठी अशक्य आहे. अभिनेत्रीने सांगितले की मला लंडनमध्ये बाहेरून जेवण मिळते. कधी कधी वाटलं तर मी घरीच सॅलड बनवते. अनेक वर्षांनंतर आता सोनम चित्रपटात पुनरागमन करणार आहे, ज्याबद्दल तिचे चाहते खूप उत्सुक आहेत.