अखेरीस सोनम कपूर झाली आई : तिला झाला मुलगा (Son...

अखेरीस सोनम कपूर झाली आई : तिला झाला मुलगा (Sonam Kapoor Deliveres A Baby Boy Today : Sonam And Anand Ahuja Share Post On Social Media)

अभिनेत्री सोनम कपूर तिच्या गरोदरपणामुळे बरेच दिवस चर्चेत होती. बऱ्याच प्रतिक्षेनंतर अखेर शनिवारी सोनम आई झाली असून तिने मुलाला जन्म दिला आहे. या संदर्भात सोनम आणि तिचा पती आनंदने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

त्या पोस्टमध्ये ‘२०.०८.२०२२ रोजी आम्ही आमच्या सुंदर बाळाचे स्वागत केले. या प्रवासात आम्हाला साथ देणाऱ्या सर्व डॉक्टर, परिचारिका, मित्र आणि कुटुंबीयांचे आभार. ही फक्त सुरुवात आहे परंतु आम्हाला माहित आहे की आमचे जीवन कायमचे बदलले आहे. – सोनम आणि आनंद.” असे लिहिले आहे. त्यांची ही पोस्ट नीतू कपूर यांनी सुद्धा शेअर केली आहे.


सोनम कपूरने 2018 मध्ये मुंबईत उद्योगपती आनंद आहुजासोबत लग्न केले. काही महिन्यांपूर्वी सोनम आणि आनंदने ते आई-बाबा होणार असल्याची गोड बातमी सोशल मीडियावर शेअर केली होती.

सोबतच त्यांनी त्यांचे काही फोटो शेअर करुन कॅप्शनमध्ये तुझ्या सर्वोत्तम देखभालीसाठी आम्ही सर्व करु शकतो, दोन ह्रदय जी कायम तुझ्यासोबत धडधडतील, आमचे कुटुंब जे तुझ्यावर प्रेम करेल. आता तुझी स्वागताची आम्ही खूप उत्सुकतेने वाट पाहत आहोत.