सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांनी पहिल्यांदा आपला ...

सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांनी पहिल्यांदा आपला मुलगा वायुला आणलं जगासमोर, पाहा व्हिडिओ (Sonam Kapoor and Husband Anand Ahuja Share a Glimpse Of Their Son Vayu’s face in this video)

सोनम कपूर आणि आनंद अहूजा यांनी २० ऑगस्ट २०२२ रोजी एका क्यूट मुलाला जन्म देत आई-बाबा होण्याचा आनंद अनुभवलाय. २०१८ मध्ये दोघांचं मोठ्या धूमधडाक्यात लग्न झालं होतं. सध्या दोघंही आपल्या मुलासोबत आपला नवा प्रवास एन्जॉय करत आहेत. आई सोनम कपूर आपल्या बाळाची जबाबदारी उत्तमरित्या सांभाळताना दिसत आहे.

पहिल्यांदाच सोनम आणि आनंद आपल्या मुलासोबत व्हेकेशेनवर गेले आहेत. सोनम कपूरने ट्रीपचे खूप सुंदर फोटो शेअर केले आहेत ज्यात उभयतांचे आपल्या मुलासोबतचे बाँडिग दिसत आहे. सोनम कपूर तिच्या लेटेस्ट रीलमध्ये मुलगा वायु कपूर आणि पती आनंद आहूजासोबत वेळ घालवताना दिसत आहे. या रीलमध्ये सोनम कपूर आनंद आहूजा आणि वायू सोबत रोड ट्रीपवर निघालेली दिसत आहे. लगेच पुढची झलक दिसतेय त्यात अनिल कपूर आपल्या नातवाला प्रेमानं फिरवताना दिसत आहेत. तर सोनम आपल्या लाडक्याला छातीशी घट्ट धरुन त्याच्यावर मायेचा वर्षाव करताना दिसत आहे.

हा व्हिडिओ सोनमने तिच्या इंस्टाग्राम पेजवर पोस्ट केला होता आणि तिने कॅप्शन दिली होती की, “स्वीट नथिंग्स. या पोस्टला प्रतिसाद देताना आनंद म्हणाला, “जगभरात माझ्यासोबत संपूर्ण जग # दररोज अभूतपूर्व”.

सोनमच्या या व्हिडीओवर भूमी पेडणेकर, आलिया भट्ट, आनंद आहूजा आणि अथिया शेट्टी अशा अनेकांनी ‘सुंदर’ अशा प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. तसेच हार्टचे इमोजी पोस्ट केले आहेत. सोनमने याआधी आपल्या मुलासोबत काही फोटो शेअर केले होते आणि त्याची जोरदार चर्चा रंगली होती. तिनं शेअर केलेल्या एका व्हिडीओत ती बाळाला ब्रेस्ट फीडिंग करतानाही दिसली होती.

सोनमनं या वर्षीच आपल्या प्रेग्नेंसीची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. तिनं बेबी बम्प सोबत आपला फोटो शेअर करत आपण आयुष्यात एका नव्या चिमुकल्या पाहुण्याचं स्वागत करणार आहोत ही गूड न्यूज चाहत्यांना दिली होती. प्रेग्नेंसी दरम्यान तिनं केलेले फोटोशूटही भलतेच चर्चेत आले होते.

सोनमच्या कामाबद्दल सांगायचे तर अनिल कपूर स्टाटर AK vs AK या सिनेमात ती शेवटची दिसलेली होती. सध्या ती मातृत्त्वाचा आनंद घेत आहे. तिच्या भविष्यातील प्रकल्पांबद्दल तिने अद्याप तपशील सांगितलेला नाही.

(फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)