सोनम कपूर-आनंद आहूजाने एक महिन्यानंतर जाहीर केल...

सोनम कपूर-आनंद आहूजाने एक महिन्यानंतर जाहीर केलं मुलाचं नाव… (Sonam Kapoor And Anand Ahuja Announce Sons Name Vayu Kapoor Ahuja )

फॅशन क्वीन सोनम कपूर (Sonam Kapoor) सध्या मातृत्त्व (motherhood) एंजॉय करत आहे. सोनम आणि आनंद (Sonam Kapoor-Anand Ahuja) यांना 20 ऑगस्ट 2022 रोजी पुत्र रत्न प्राप्त झाले आणि आता त्यांचा मुलगा एक महिन्याचा झाला असून त्यांनी त्याचे नाव इन्स्टाग्रामवर जाहीर केले आहे. इंस्टाग्रामवर मोठी लांबलचक पोस्ट लिहून सोनमने तिच्या मुलाचं नाव आणि त्याच्यासाठी हे नाव का निवडलं, याचं कारण सांगितलं आहे.

सोनमने प्रसूतीनंतर पहिल्यांदाच तिचा फॅमिली फोटो तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. फोटोमध्ये सोनम, आनंद आणि त्यांचा मुलगा दिसत आहे. मात्र, मुलाचा चेहरा स्पष्ट दिसत नाही. या सुंदर अशा फॅमिली फोटोमध्ये सोनम, आनंद व बाळ या तिघांनीही मॅचिंग पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत. पिवळ्या रंगाच्या एथनिक आउटफिटमध्ये सोनम सुंदर दिसत आहे, तर आनंदनेही पिवळ्या रंगाचा नक्षीदार कुर्ता परिधान केलाय.

सोनमने तिच्या इन्स्टा स्टोरीवर तिच्या मुलासोबतचे आणखी सुंदर फोटो शेअर केले आहेत. या फोटोत आनंद आहूजानं आपल्या लाडक्या मुलाला कुशीत घेतलं आहे आणि सोनम कपूर आपल्या बाळाला टक लावून पाहत आहे. अभिनेत्रीनं या फोटोला शेअर करत लिहिलं आहे की,”आमच्या आयुष्यात नवा पाहुणा सामिल झाला आहे. भगवान हनुमान आणि भीमच्या रुपात हा आमची ताकद आणि हिमतीचं प्रतिक आहे. आमच्या वायू कपूर-आहूजाला आशीर्वाद द्या. हिंदू धर्मात वायू पाच तत्वांपैकी एक आहे. वायू स्वतःमध्ये एक शक्तिशाली ईश्वर आहे. आणि म्हणूनच आम्ही आमच्या मुलाचं नाव वायू ठेवलं आहे”.

सोनम कपूर आपल्या मुलाविषयी सांगताना पुढे लिहिते की,”वायू या ब्रह्मांडाचा श्वास आहे. बुद्धिचा मार्गदर्शक आहे. प्राण, इंद्र, शिव आणि काली सगळेच वायुशी जोडलेले आहेत. वायू एवढा शक्तिशाली आहे की जो अगदी सहज एखाद्या जीवात प्राण फुंकतो, आणि तितक्याच ताकदीनं वाईटाचा सर्वनाशही करतो. आणि म्हणूनच वायूला शूरवीर आणि सुंदर अशा उपमाही दिल्या गेल्यात. सगळ्यांचे मी पुन्हा आभार मानते ज्यांनी आम्हाला शुभेच्छा दिल्या आणि आशीर्वाद दिले”.

दुसऱ्या फोटोत पापा आनंद आपल्या हातातल्या वायुकडे पाहताना दिसत आहे आणि सोनम देखील आनंदचा हात धरलेल्या मुलाकडे पाहत आहे. ही सर्व छायाचित्रे इतकी क्युट आहेत की चाहते त्यावर जोरदार कमेंट करत आहेत. तो जोडप्याचे अभिनंदन करत आहे आणि मुलासाठी शुभेच्छा देत आहेत.