बिग बॉसमध्ये सोनाली पाटील द...

बिग बॉसमध्ये सोनाली पाटील देणार प्रेमाचे धडे (Sonali Patil To Deliver Love Lessons In Big Boss)

‘बिग बॉस मराठी ३’ दिवसेंदिवस रंगतदार होत आहे. आता घरातील सदस्य एकमेकांसोबत मनमोकळ्या गप्पा मारत आहेत. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल “BB College”  सुरू झाले असून ती या आठवड्याची थीम असणार आहे. या BB college मध्ये विद्यार्थीच नव्हे तर प्राध्यापकही धाक दाखविण्याबरोबरच विद्यार्थ्यांसोबत मैत्री करून मज्जा करत त्यांना शिकवताना दिसणार आहेत. बिग बॉस यांनी सदस्यांवर “करूया आता कल्ला” हे साप्ताहिक कार्य सोपवले आहे. या कार्यात कॅप्टन्सीचे दोन उमेदवार निवडले जाणार आहेत. आता लक्षवेधी विद्यार्थी ठरण्यासाठी सदस्य प्रयत्न करणार हे निश्चित. जे विद्यार्थी अधिक स्टार मिळवतील ते कॅप्टन पदाचे दोन उमेदवार म्हणून कार्याच्या शेवटी निवडले जातील.

बिग बॉस, सोनाली पाटील, Sonali Patil, Big Boss marathi

काल उत्कर्ष, आदिश, दादूस या प्राध्यापकांचे तास भरले. आज सुरेखा कुडची, सोनाली, मीरा यांचे तास भरणार आहेत. स्टार मिळविण्यासाठी सगळ्यांचीच धडपड सुरू आहे. बरेच प्लॅन देखील आखले जात आहेत. काल स्नेहाला दोन तर विशाल निकमला एक स्टार मिळाला. काल दादूस यांच्या क्लासमध्ये संगीताची मैफल रंगली, तर आदिशने गायत्रीला हसवले, उत्कर्षने घरातील equation बद्दल बरंच काही सांगितलं. आज सोनाली पाटील BB college मध्ये प्रेमाचे धडे देणार आहे. सोनालीच्या तासात प्रेमाचे वारे वाहणार आहेत. बिग बॉस मराठीच्या घरात जय – स्नेहा, सोनाली – विशाल यांना सहसदस्यांकडून खूप चिडवले जात आहे. तसेच काहीसे आज देखील होणार आहे. सोनाली विद्यार्थ्यांना त्यांच्या पहिल्या प्रेमाबद्दल विचारणार आहे. तेव्हा सोनालीच्या वर्गात विकास, आविष्कार, मीनल, जय सगळेच विशाल – सोनालीला चिडवताना दिसणार आहेत. तेव्हा दर्शकांना आणि सदस्यांना विशाल – सोनालीचा रोमॅंटिक अंदाज प्रेक्षकांना आज घायाळ करणार हे नक्की!