सोनाली कुलकर्णीचा मराठी बाणा; कपिल शर्माला केला...
सोनाली कुलकर्णीचा मराठी बाणा; कपिल शर्माला केला मराठीत बोलण्याचा आग्रह (Sonali Kulkarni Makes Kapil Sharma To Speak In Marathi)

कॉमेडी किंग कपिल शर्मा (Kapil Sharma) याचा हजरजबाबीपणा सर्वश्रुत आहे. त्याच्या आधारे तो मोठमोठ्या कलाकारांची बोलती बंद करतो. परंतु आज होणाऱ्या कार्यक्रमात आपली मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी येणार आहे. तिनं मराठी बाणा दाखवत कपिल शर्माला असा प्रश्न केला की, तो तिच्या जाळ्यात अडकला… मात्र त्याने चतुराईने बाजू सावरली. अन् प्रेक्षकांना जाम हसविले.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम
या कार्यक्रमात सोनाली सोबत सचिन खेडेकर आणि रवि किशन आहेत. याच्या प्रोमोत दिसतं की, कपिल आपल्या नेहमीच्या शैलीत या पाहुण्यांचं स्वागत करतो. तेव्हा त्याला मध्येच तोडत सोनाली म्हणते, “नेहमी हिंदी-इंग्लिशमध्ये बोलता… कधी मराठीत पण बोला ना!” तिचा आग्रह बघून कपिल चूप होतो. पण मग अशी मराठी बोलतो की सगळ्यांना जाम हसायला येतं.
सोनाली पुढे कपिलला प्रश्न करते, “तुम्ही मुंबईत राहता, अन् मराठी बोलता येत नाही?” तिच्या या प्रश्नावर कपिलने मराठीमध्ये पंजाबी ढंग मिक्स करून असे काही संवाद घेतले की, लोकांची हसता हसता पुरेवाट झाली. सोनालीला पण हसू आवरले नाही.

कपिल शर्मा, कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाच्या स्टाईलमध्ये हा कार्यक्रम पेश करणार आहे. कपिल सांगतो की, सोनाली कुलकर्णीसारख्या मुली बिग बीच्या समोर येतात तेव्हा ते गुलाबाचे फुल कोणत्या रंगाचे असते, असा साधा प्रश्न विचारतात. अन् आम्ही जातो तेव्हा विचारतात की, हुमायुन कधी आला होता?
फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम