सोनाक्षी सिन्हा चित्रपटात नाही करणार किसिंग आणि...

सोनाक्षी सिन्हा चित्रपटात नाही करणार किसिंग आणि इंटीमेट सीन, हे आहे कारण (Sonakshi Sinha Will Not Do Kissing And Intimate Scenes In Films, Knowing The Reason,You Will Also Appreciate)

बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी सोनाक्षी सिन्हा हिने इंडस्ट्रीत आपला वेगळा ठसा उमटवला आहे. सध्या ती फारशा चित्रपटात दिसत नसली तरी तिने आपल्या दमदार अभिनयाने लोकांची मने जिंकली आहेत. एक उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच ती खूप हुशार देखील आहे. एका मुलाखतीदरम्यान सोनाक्षीने सांगितले होते की, तिने करारात स्पष्टपणे लिहिले आहे की ती किसिंग सीन करणार नाही तसेच बिकिनीही घालणार नाही.

इतकंच नाही तर सोनाक्षी सिन्हाने असंही म्हटलं होतं की, तिने आपल्या कॉन्ट्रॅक्टमध्ये असंही लिहिलं आहे की मी इंटिमेट सीन्स करणार नाही. अभिनेत्रीने सांगितले की, मला माझे चित्रपट कुटुंबासोबत पाहता यावेत म्हणून मी या गोष्टी कॉन्ट्रॅक्टमध्ये लिहिल्या आहेत.

याच कारणामुळे मी ‘द डर्टी पिक्चर’ सारखे चित्रपट करणार नसल्याचे सोनाक्षी सिन्हा म्हणाली होती. ती म्हणाली की, मी बिहारची मुलगी आहे आणि माझ्या वडिलांचीही इज्जत आहे. मी असे काम कधीच करणार नाही, जे मी माझ्या कुटुंबियांसोबत पाहू शकत नाही. इतकंच नाही तर सोनाक्षीने आपल्या लग्नाबद्दल बोलताना म्हटलं होतं की, ती खूप बिझी असल्यामुळे ती कधीही कोणत्याही अभिनेत्याशी लग्न करणार नाही.

सोनाक्षी सिन्हाने ‘द डर्टी पिक्चर’ या चित्रपटाविषयी बोलताना अभिनेत्री विद्या बालनचे खूप कौतुक केले, पण त्याचबरोबर तिने असेही म्हटले की ती ‘डर्टी पिक्चर’मधली विद्या बालन बनू शकत नाही. याबद्दल बोलताना सोनाक्षी म्हणाली की, विद्याने जे केले ते मी कधीच करू शकत नाही. हे माझ्या तत्त्वांच्या विरुद्ध आहे. पण विद्याने अप्रतिम काम केले आहे.”

सध्या सोनाक्षी सिन्हा तिच्या आगामी ‘डबल एक्सएल’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला असून, त्याला लोकांकडून भरभरून प्रेम मिळत आहे. या चित्रपटात सोनाक्षी सिन्हासोबत हुमा कुरेशीही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.. दोन्ही अभिनेत्रींनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर चित्रपटाचा टीझर पोस्ट केला आहे.

फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम