संजय लीला भन्साळी यांच्या आगामी ‘हिरा मंडी’ चित...

संजय लीला भन्साळी यांच्या आगामी ‘हिरा मंडी’ चित्रपटात सोनाक्षी सिन्हा दिसणार एका खास भूमिकेत (Sonakshi Sinha Will Be Seen In A Special Role In Sanjay Leela Bhansali’s upcoming Film Hira Mandi)

बॉलीवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाक्षी आता सुप्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी सोबत काम करणार आहे. संजय लीला भन्साळी यांनी आपल्या नव्या चित्रपटासाठी सोनाक्षी सिन्हाला साईन केलंय. संजय लीला भन्साळी यांच्या आगामी ‘हिरा मंडी’ चित्रपटात सोनाक्षी सिन्हा, एका खास भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट सोनाक्षीच्या करिअरमधील सर्वात महत्वाचा चित्रपट ठरेल असा अंदाज व्यक्त केला जातोय.

बॉलीवूड हंगामाच्या वृत्तानुसार संजय लीला भन्साळी यांनी या चित्रपटासाठी बॉलीवूडच्या दोन अभिनेत्रींची निवड केलीय. सोनाक्षी सिन्हापूर्वी अभिनेत्री हुमा कुरेशीलाही या चित्रपटासाठी साईन करण्यात आलंय. यापूर्वी सोनाक्षी सिन्हाने राऊडी राठोडमध्ये संजय लीला भन्साळी प्रॉडक्शनमध्ये काम केलं होतं. मात्र आता सोनाक्षी खुद्द संजय लीला भन्साळीसोबत हीरा मंडी या चित्रपटात काम करणार आहे. मात्र अद्याप, या चित्रपटाच्या मेकर्सनी सोनाक्षीला कास्ट केल्याबाबत जाहीर केलं नाही.

सोनाक्षीची भूमिका कशी असेल?

एका वृत्तानुसार, सोनाक्षी सिन्हा या चित्रपटात सेक्स वर्करच्या भूमिकेत दिसणार आहे. या महत्त्वाच्या भूमिकेसाठी सोनाक्षीने आधीच तयारी सुरू केली आहे. इतकंच नाही तर सोनाक्षीने कथ्थक शिकायला सुरुवात केल्याचं बोललं जात आहे. संजय लीला भन्साळीची हीरा मंडी ही एक बिग बजेट वेब सीरीज असणार आहे.

सोनाक्षी सिन्हा ही सध्या तिच्या आगामी ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’ या चित्रपटासाठी चर्चेत आहे. या चित्रपटात सोनाक्षीसह अजय देवगन आणि संजय दत्त सारखे अनेक कलाकार दिसणार आहेत. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. सोनाक्षी सिन्हाने आपल्या करिअरची सुरुवात सलमान खान सोबत दबंगमधून केली होती. या चित्रपटानंतर सोनाक्षीने लुटेरा,  आर राजकुमार, अकिरा, कलांक, मिशन मंगल, सन ऑफ सरदार अशा वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे


All Photos Instagram