बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच साजिद खान आणि अब...

बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच साजिद खान आणि अब्दु रोझिकला मिळाली फराह खानकडून बर्गर पार्टी(‘Sometimes It’s Even Better To Just Win Hearts’ Writes Farah Khan As She Hosts Burger Party For Sajid Khan And Abdu Rozik)

अब्दू रोझिक बिग बॉस 16 च्या घरातून आधीच बाहेर पडला होता. त्याच्यानंतर आता साजिद खान देखील घरातून बाहेर पडला आहे. पण बाहेर येताच बहीण फराह खानने त्याचे भव्य स्वागत केले. फराहने साजिद आणि अब्दूसाठी बर्गर पार्टी ठेवली होती. फराहने दोघांसोबतचे फोटोही शेअर केले आहेत.

फराहने शेअर केलेल्या पहिल्या फोटोमध्ये तिघेही हसत हसत पोज देत आहेत. त्यांच्यासमोर बर्गर आणि फ्रेंच फ्राईज ठेवले आहेत. खरं तर, अब्दूला बर्गर खूप आवडतात आणि तो बिग बॉसच्या घरातही बर्गर खाण्याबद्दल बोलत असे.त्यामुळेच फराहने त्याचा आवडता बर्गर खायला देऊन खुश केले.

दुस-या फोटोत अब्दु आणि फराह आपल्या हातांनी हृदय आकार बनवताना दिसत आहेत. तिसर्‍या फोटोत साजिद अब्दुला मिठी मारत आहे. फराहने कॅप्शनमध्ये लिहिले आहे – या सीझनमधील माझे दोन आवडते… कधी कधी ट्रॉफीपेक्षा फक्त मन जिंकणेही चांगले असते.

या पोस्टला कित्येकजण लाइक करत आहे. अनेक सेलिब्रिटींनीही कमेंट केली आहे. मलायका आणि सानिया मिर्झापासून ते सीमा सजदेह, युविका चौधरी, सुगंधा मिश्रा यांनी या पोस्टवर प्रेमाचा वर्षाव केला आहे.

चाहतेही अब्दुवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. बिग बॉसच्या बाहेर खरी मजा आणि गंमत असल्याचे ते सांगत आहेत. त्याचबरोबर अब्दु बाहेर पडल्याने काही लोक निराशही झाले आहेत.