सोनाक्षी सिन्हाला सलमान खानसोबत काम करण्यापूर्व...

सोनाक्षी सिन्हाला सलमान खानसोबत काम करण्यापूर्वी मिळाली होती तंबी (Somebody Had Warned Sonakshi Sinha About Working With Salman Khan, You Will Be Stunned To Know The Reason)

सध्या सोनाक्षी सिन्हा आपल्या ‘डबल एक्सएल’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात सोनाक्षी सिन्हासोबत हुमा कुरेशीही मुख्य भूमिकेत आहे. एका मुलाखतीदरम्यान सोनाक्षी सिन्हाने आपल्या करीअरचे काही अनुभव शेअर केले. तिने सांगितले की, जेव्हा मी पहिल्यांदा ‘दबंग’ चित्रपटात काम करणार होती, तेव्हा मला कोणीतरी सलमान खानबद्दल सावध केले होते.

 सोनाक्षी सिन्हाने दबंग या चित्रपटातून सलमान खानसोबत चित्रपटांमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात सोनाक्षीसोबत सलमान खान मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटातून सोनाक्षी सिन्हाला खुद्द सलमान खाननेच लॉन्च केले होते. सोनाक्षी सिन्हाला या चित्रपटातील तिच्या कामासाठी सर्वोत्कृष्ट महिला पदार्पण पुरस्कारही मिळाला होता.

एका सुप्रसिद्ध वेब पोर्टलशी बोलताना सोनाक्षी सिन्हाने सांगितले की, तिला एकाने सांगितलेले की, जो सलमान खानसोबत पदार्पण करतो त्याचे करिअर फार काळ टिकत नाही. सोनाक्षी म्हणाली, “जी नवीन व्यक्ती आपल्या करीअरची सुरुवात करणार आहे त्याला असे म्हणणे किती चुकीचे आहे. मी त्यावेळी या सर्व गोष्टींकडे लक्ष दिले नाही. मी फक्त माझ्या कामावर लक्ष केंद्रित केले आणि तेच योग्य होते.”

सोनाक्षी सिन्हा सलमान खानचा खूप आदर करते. तिने सलमान खानसोबत अनेकदा काम केले आहे.शिवाय ज्या व्यक्तीने सलमानबाबत सोनाक्षीला अशी माहिती दिली होती त्याला तिने चुकीचे ठरवले. सोनाक्षीने आपल्या करीअरमध्ये आतापर्यंत अनेक उत्कृष्ट चित्रपटांमध्ये काम केले आहे.

सोनाक्षी शेवटची ‘भुज द प्राइड’ चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात सोनाक्षी व्यतिरिक्त संजय दत्त आणि अजय देवगण देखील महत्त्वाच्या भूमिकेत होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा चालला नाही.

‘डबल एक्सएल’ या चित्रपटाबाबत सोनाक्षी म्हणाली, “हा आम्हा दोघींचा वैयक्तिक चित्रपट आहे. महिलांना अनेकदा बॉडी शेमिंगला सामोरे जावे लागते. परंतु यामुळे तुमची स्वप्ने अर्धवट सोडू नका. कोणालाही तुम्ही मागे खेचू देऊ नका.” बॉडी शेमिंगसाठी हुमा कुरेशी आणि सोनाक्षी सिन्हा यांना अनेकदा ट्रोल करण्यात आले आहे, परंतु या दोन्ही अभिनेत्रींनी नेहमीच आपल्या उत्कृष्ट कामातून त्या ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिले.

सोनाक्षीच्या पुढील कामांबद्दल बोलायचे झाल्यास ती लवकरच ककुडा या चित्रपटात दिसणार आहे. हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट असून या चित्रपटात सोनाक्षीसोबत रितेश देशमुख आणि साकिब सलीम मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

फोटोसौजन्य- इन्स्टाग्राम