कोणाचं मनं फिटनेस ट्रेनरवर जडलं तर कोणी फोटोग्र...

कोणाचं मनं फिटनेस ट्रेनरवर जडलं तर कोणी फोटोग्राफरच्या प्रेमात पडली, जाणून घ्या या स्टारकिड्सच्या बॉयफ्रेंडबद्दल (Somebody Gave Heart to Fitness Trainer, Some Fell in Love With Photographer, Know About Boyfriends of These Star kids)

अनेक बॉलिवूड स्टार्सची मुले देखील आपल्या दमदार अभिनयाने स्टार बनली आहेत. काहीजणांनी तर आपल्या पालकांपेक्षा जास्त प्रसिद्धी मिळवली आहे. पण असेही अनेक स्टार किड्स आहेत जे बॉलिवूडमध्ये सक्रिय नसले तरी अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने प्रसिद्धीच्या झोतात असतात. हे स्टार किड्स कधी त्यांच्या लाइफस्टाइलमुळे चर्चेत असतात तर कधी त्यांच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत असतात. खासकरुन काही सेलिब्रेटींच्या मुली या त्यांच्या लव्ह लाइफमुळे जास्त चर्चेत असतात. त्यांच्यातील कोणी फिटनेस ट्रेनरच्या प्रेमात पडले आहे तर कोणी फोटोग्राफरच्या प्रेमात आहे. आज आम्ही अशाच काही स्टाक किड्सबद्दल सांगणार आहोत.

खुशी कपूर

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीची धाकटी मुलगी खुशी कपूर लवकरच ‘द आर्चीज’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे, पण त्याहीपेक्षा ती तिच्या रिलेशनशिपमुऴे चर्चेत आहे. सध्या खुशी कपूर आणि अक्षत राजन यांच्यात जवळीक वाढत असल्याच्या चर्चा आहेत. दोघेही एकमेकांना डेट करत असल्याचे बोलले जाते. व्यावसायिक अभिजित राजन यांचा मुलगा अक्षत हा व्यवसायाने उद्योजक आणि इव्हेंट मॅनेजर आहे.

इरा खान

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानची मुलगी इरा खान आपल्या लव्ह लाईफमुळे अनेकदा चर्चेत असते. इराही नुपूर शिखरेला डेट करत असल्याचे सर्वांनाच माहिती आहे. नुपूर शिखरे हा व्यवसायाने फिटनेस ट्रेनर आहे. तो केवळ इरालाच नाही तर अनेक सेलिब्रटींना फिटनेस ट्रेनिंग देतो.

श्रद्धा कपूर

बॉलिवूडचा प्रसिद्ध खलनायक शक्ती कपूरची लेक श्रद्धा कपूरने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात एक खास स्थान निर्माण केले आहे. पण ती आपल्या अफेअरमुळेही चर्चेत असते. श्रध्दाचा बॉयफ्रेंड रोहन श्रेष्ठ हा फोटोग्राफर असल्याचं बोललं जातं, पण सध्या दोघांचा ब्रेकअप झाल्याच्या चर्चा होत आहेत.

अलाया फर्नीचरवाला

अभिनेत्री पूजा बेदीची मुलगी अलाया फर्निचरवाला अनेकदा चर्चेत असते. तिचे नाव अनेकदा ऐश्वर्य ठाकरेसोबत जोडले गेले आहे. दोघे एकमेकांना डेट करत असल्याचे म्हटले जाते, पण अलाया नेहमीच ऐश्वर्य आपला चांगला मित्र असल्याचे सांगते. ऐश्वर्य हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पुतण्या आहे.

श्रुति हासन

साऊथचा सुपरस्टार कमल हासनची मुलगी श्रुती हासन साऊथसोबतच बॉलिवूड चित्रपटांमध्येही दिसली आहे. तिच्या बॉयफ्रेंडचे नाव शंतनू हजारिका असल्याचे सांगितले जाते, जो व्यवसायाने व्हिज्युअल आर्टिस्ट आहे आणि त्याने अनेक मोठ्या स्टार्ससोबत काम केले आहे.

आलिया कश्यप

बॉलिवूडचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप यांची मुलगी आलिया कश्यप शेन ग्रोगोइरसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे बोलले जात आहे. अमेरिकन वंशाचा शेन ग्रेगोइर हा एक उद्योजक आहे.

सोनाक्षी सिन्हा

बॉलिवूडची दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हाही शत्रुघ्न सिन्हा यांची लाडकी कन्या आहे. सोनाक्षीने अनेक चित्रपटांमध्ये आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे. सोनाक्षीसुद्धा अनेकदा तिच्या रिलेशनमुळे चर्चेत असते. सोनाक्षी सिन्हा झहीर इक्बालला डेट करत असल्याचं म्हटलं जाते. तो एक अभिनेता आहे.