सोनम कपूरच्या जीवनात कुणीतरी ‘स्पेशल’ आलं आहे...
सोनम कपूरच्या जीवनात कुणीतरी ‘स्पेशल’ आलं आहे… पाहूया त्याचा फोटो (Some ‘Special’ Enters In Sonam Kapoor’s Life : The Actress Shares His Photo)

बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री सोनम कपूर सोशल मीडियावर आपले फोटो आणि व्हिडिओज् पोस्ट करून चाहत्यांना अपडेट देत राहते. सध्या सोनम चित्रपटांमध्ये दिसत नसली तरी सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रीय असते. अनिल कपूरप्रमाणेच त्याची ही लेकही चित्रसृष्टीमध्ये बरीच प्रसिद्ध आहे. शिवाय आनंद आहुजासोबत लग्न झाल्यानंतर आपल्या वैवाहिक जीवनातही ती अतिशय आनंदी आहे. वरचेवर आपल्या पतीसोबतचे फोटो ती शेअर करत असते, ज्यावर चाहतेही भरभरून प्रतिक्रिया देत असतात.

फोटो सौजन्य – इंस्टाग्राम
मागील काही दिवसांपासून सोनम कपूर गरोदर असल्याच्या बातम्या येत होत्या, पण यात कितपत तथ्य आहे हे अजूनही कळलेलं नाही. दरम्यान आता सोनमने तिचा एक फोटो इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करुन तिच्या जीवनात कोणीतरी स्पेशल आलं आहे, असं म्हटलं आहे. सोनमची ही पोस्ट वाऱ्याच्या वेगाने पसरत असून, चाहत्यांची स्पेशल कोण हे जाणून घेण्याची उत्सुकता वाढली आहे.

तिने आपल्या फोटोसह कॅप्शन देत म्हटलंय – ”कुणीतही स्पेशल आहे ज्याने माझ्या जीवनात प्रवेश केला आहे आणि हा अतिशय सुंदर अनुभव आहे. त्याच्याशी तुमची ओळख करून देण्यासाठी मी स्वतःला रोखू शकत नाही. लवकरच त्याला भेटण्यासाठी तयार व्हा.”
फोटो सौजन्य – इंस्टाग्राम

सोनम कपूरच्या या पोस्टमुळे ती गरोदर असणार याबाबत चाहत्यांची जवळजवळ खात्रीच झाली आहे. आणि तशाच आशयाच्या ते प्रतिक्रिया देत आहेत. कोणी तू गरोदर आहेस का? असं विचारतंय तर कुणी ती गरोदरच आहे, असं ठामपणे सांगत आहेत. मात्र सोनमने अजूनही या गोष्टीचा खुलासा केलेला नाही. हा स्पेशल कोण हे जाणून घेण्यासाठी चाहत्यांना काही महिने थांबावे लागेल बहुतेक…

फोटो सौजन्य – इंस्टाग्राम
रणबीर कपूरसोबत ‘सांवरिया’ या चित्रपटापासून सोनम कपूरने तिच्या करियरची सुरुवात केली होती. तर ‘द जोया फॅक्टर’ या चित्रपटात ती शेवटची दिसली होती. या व्यतिरिक्त सोनमने ‘रांझणा’, ‘नीरजा’, ‘दिल्ली 6’ आणि ‘आई हेट लव स्टोरी’ सारख्या यशस्वी चित्रपटांतून भूमिका करून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. त्यासाठी तिला झी ॲवॉर्ड आणि फिल्मफेअरही मिळाला आहे.