श्री गणेशासंबंधीची काही रोचक तथ्यं (Some Intere...

श्री गणेशासंबंधीची काही रोचक तथ्यं (Some Interesting Myths About Lord Ganesh)

कोणत्याही कामाची सुरुवात श्री गणेशाला नमन केल्याशिवाय होत नाही. अवघ्या दिनांचा नाथ असलेल्या गणेशाला निःस्वार्थीपणे, भक्तिभावाने पुजल्यास तो आपल्या मनोकामना पूर्ण करतोच.
जाणून घेऊया श्री गणेशासंबंधीची महत्त्वपूर्ण तथ्यं…
– कुंडलिनी योग शास्त्रामध्ये जी सात चक्रं सांगितली जातात. त्यातील सर्वात पहिलं जे मूलाधार चक्र, तेथे श्री गणेशाचं निवास स्थान असतं.
– महर्षी व्यास निर्मित महाभारताचे गणपती हे लेखनिक होते. व्यास महर्षी बोलत होते आणि गणपती लिहीत होते. असं म्हणतात की, महाभारत लिहिण्यासाठी त्यांच्याकडे लेखणी नव्हती, तेव्हा गणेशाने आपला एक दंत तोडून, आपल्या दंताने महाभारत लिहिलं, तेव्हापासून गणपतीला एकदंत असं नाव पडलं.
– श्री गणेशाच्या कानामध्ये वैदिक ज्ञान, मस्तकामध्ये ब्रह्मलोक, डोळ्यांत लक्ष्य, उजव्या हातात वरदान, डाव्या हातामध्ये अन्न, सोंडेमध्ये धर्म, पोटात सुख-समृद्धी, नाभीमध्ये ब्रह्मांड आणि पायांशी सप्तलोक आहे.
– प्रत्येक युगामध्ये श्री गणेशाच्या वेगवेगळ्या रूपाची पूजा केली गेली आहे. गणेश पुराणात नमूद असलेल्या माहितीनुसार, सत्ययुगात श्री गणेश दशभुजा आणि सिंहावर आरूढ झालेल्या विनायक रूपात होते, तर त्रेता युगातील गणेश सहा हात असलेले आणि श्‍वेतवर्णीय होते.

या युगात गणेशाचे वाहन मोर होते. द्वापार युगात चर्तुभुज असलेल्या रक्तवर्णीय (लाल रंग), तसेच ज्याचे वाहन मूषक होते अशा गजाननाचे तर कलयुगात दोन हात, अश्‍व वाहन आणि धूम्रवर्णीय धुम्रकेतू असे गणेशाचे रूप सांगितले आहे.
– घरात गणपतीचा असा फोटो लावावा ज्या फोटोमध्ये गणपतीसोबत मोदक आणि उंदीर दोन्ही असावे. यामुळे घरामध्ये सुख-समृद्धी येते.
– श्‍वेतवर्णीय गणपतीची पूजाअर्चा केल्यास घरात शांतता नांदते.
– ज्यांना मूल हवं असेल त्यांनी गणेशाच्या बाल रूपाची पुजा करावी.
– घरामध्ये चांदीचा गणपती अथवा कमळावर बसलेली गणपती मूर्ती पुजली गेली तर त्या घरात धन-संपत्ती विपुल प्रमाणात राहते.

– कुटुंबातील व्यक्तींमध्ये आपापसात प्रेम, जिव्हाळा राहावा. वाद, भांडणं होऊ नयेत व शांतता राहावी यासाठी चंदनाचा गणपती पुजावा.
– घरातील सर्व कार्ये सिद्धीस जावी यासाठी केशरी रंगाच्या गणपतीची पूजा करावी.
– घराच्या मध्यभागी पूर्व दिशेला गणपती ठेवणे शुभ असते.
– घराच्या मुख्य दारावर पाठीला पाठ टेकलेल्या गणपतीच्या दोन मूर्ती लावाव्यात. यामुळे सर्व प्रकारचे वास्तूदोष दूर होतात.
– घरामध्ये गणपतीची बसलेली मूर्ती आणि दुकान किंवा ऑफिसमध्ये उभी मूर्ती ठेवणे शुभ असते.

लक्षात ठेवा
– श्री गणेशाचे मुख कधीही दक्षिणेकडे नसावे.
– एकाच घरात तीन गणपती कधीही पूजू नयेत.
– घरी पूजेसाठी स्थापना करण्यात आलेला गणपती कधीही डाव्या सोंडेचा असावा.