उष्माघात वाढतोय, काळजी घ्या...

उष्माघात वाढतोय, काळजी घ्या…(Solutions To Get Rid Of Heat Wave)

उन्हाळ्याचा दाह जाणवायला आता सुरूवात झाली आहे. उष्णतेमुळे आपल्या शरीरातील पाणी झपाट्याने कमी होते. त्यामुळे उष्णतेचे अनेक विकार सुरू होतात. म्हणून वेळीच काळजी घ्यावयास हवी. सगळ्यात महत्त्वाचा उपाय म्हणजे शरीरातील पाणी वाढवले पाहिजे. याशिवायही उन्हाळ्याचा त्रास जाणवू नये याकरिता काही उपाय आहेत. पाहूया –
उपाय
नियमित प्राणायाम करा. उष्णतेचा त्रास केव्हाच होणार नाही.
अनुलोम विलोम जास्तच करा. शरीराचे तापमान स्थिर राहील.
उजवी नाकपुडी बंद करून डावी नाकपुडी जास्तच वेळ चालू ठेवा. कारण ती चंद्रनाडी आहे. त्यामुळे शरीरात गारवा तयार होईल.
उजव्याच कुशीवर जास्त वेळ झोपा. त्यामुळे डावी नाकपुडी आपोआप जास्त वेळ चालू राहील. सकाळच्या आणि दुपारच्या जेवणानंतर मात्र थोडा वेळ डाव्या कुशीवर अवश्य झोपा, ज्यायोगे पाचक रस जास्त स्रवण्यास मदत होईल.
हलकाच आहार घ्या. पोट साफ ठेवा. पित्त वाढवू नका.
माठातीलच थंड पाणी अगर कोमट पाणी बसून सावकाश चवीचवीने प्या. घटाघटा प्यायचे नाही.
पेयामध्ये बर्फ वापरू नका. बर्फ गरम आहे.


आवळा/कोकम/लिंबू/मठ्ठा/ताक इत्यादी सरबत जरूर प्या.
सकाळी ऊठल्यावर लगेच 1 ते 2 ग्लास कोमट पाणी सावकाश प्या.
प्रत्येक काम सावकाश करा.
जेवतेवेळी मधे मधे एक दोन वेळा एखादा घोट असे थोडे पाणी प्यावे.
ऊन्हातून आल्यावर गूळ पाणी प्यावे.
खडीसाखर सोबतच ठेवून थोडी थोडी खा.
जिरेपूड 1 चमचा + खडीसाखर 1 चमचा व 1 ग्लास ताकातून रोज प्या. उष्णता वाढणार नाही.
दुपारच्या जेवणात रोज पांढरा कांदा जरूर खा.
रात्री झोपण्यापूर्वी खोबरेल तेल तळपायांना चोळावे व बेंबीत घालावे. तसेच देशी गाईचे तूप नाकात घालावे.
उन्हापासून शरीराचे रक्षण करण्यासाठी टोपी, छत्री, गॉगल वापरा.