सोहा अली खानच्या वाढदिवसानिमित्त तिची लेक इनाया...

सोहा अली खानच्या वाढदिवसानिमित्त तिची लेक इनायाने लिहिली आपल्या हाताने नोट (Soha Ali Receives Hand Written Birthday Note From Daughter Inaya, Actress Is Celebrating 44th Birthday Today)

शर्मिला टागोर व नवाब मन्सूर अली खान पतौडी यांची मुलगी आणि सैफ अली खानची बहीण सोहा अली खान आज आपला 44 वा वाढदिवस साजरा करत आहे. सोहा तीन भावंडांमध्ये सर्वात लहान असून ती कुटुंबातील सर्वांची लाडकी आहे. सोहा प्रत्येक खास प्रसंग कुटुंबासोबत साजरा करते. विशेषत: मुलगी इनाया सोबत ती प्रत्येक सण, प्रत्येक कौटुंबिक सोहळे साजरे करते. या संदर्भातील फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते.

सोहा आणि कुणाल खेमूने आपल्या मुलीला दिलेले चांगले संस्कार आणि तिच्या संगोपनाची झलक अनेकदा सोशल मीडियावर पाहायला मिळते. सोहा आणि कुणाल आपल्या मुलीवर खूप प्रेम करतात. इनाया देखील तिच्या आईवडिलांवर खूप प्रेम करते. आज सोहाचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिची लेक इनायाने तिला खूप गोड वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत, ज्याची एक झलक तिने सोशल मीडियावर शेअर केली आहे.

इनायाने आपल्या आईच्या वाढदिवसानिमित्त हाताने वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारी चिठ्ठी लिहिली आहे. सोहा अली खानने इन्स्टाग्रामवर ती शेअर केली आहे. फोटो पोस्ट करताना सोहाने हार्ट इमोजी शेअर केला आहे. इनायाने चिठ्ठीत लिहिले आहे की, “आईसाठी… आई मी तुझ्यावर खूप प्रेम करते आणि आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुझी प्रिय, इनाया.”

इनायाची ही छोटीशी वाढदिवसाची नोट इतकी सुंदर आहे की प्रत्येकजण या पोस्टवर लाइक्सचा वर्षाव करत आहेत. सोहा अनेकदा आपल्या सोशल मीडिया हँडलवर मुलगी इनाया नौमी खेमूचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.

काही दिवसांपूर्वीच सोहा व कुणालने आपल्या मुलीचा पाचवा वाढदिवस साजरा केला. त्यासाठी त्यांनी मुंबईत वाढदिवसाची पार्टी ठेवली होती. त्या पार्टीतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

कुणाल खेमूने सुद्धा आपल्या प्रिय पत्नीला अनोख्या अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने इन्स्टाग्रामवर खूप सारे फोटो शेअर करुन एक विनोदी नोट लिहिली आहे.

अभिनेत्री करीना कपूर खानने सुद्धा नणंदेला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आपल्या लग्नातील सोहाचा एक कधीही न पाहिलेला फोटो शेअर केला आहे. फोटोत सैफ आपल्या दोन्ही बहिणी सोहा आणि सबासोबत लग्न मंडपात जात आहे.