सोहा अली खानच्या नितळ त्वचेचं रहस्य ती दररोज मू...

सोहा अली खानच्या नितळ त्वचेचं रहस्य ती दररोज मूठभर बदाम खाते (Soha Ali Khan Consumes Handful Of Almonds Daily To Maintain Skin Health)

बॉलीवूड तारका सोहा अली खानने आपले सौंदर्य व नितळ त्वचा याचे रहस्य सांगितले कि, ती दररोज मूठभर बदाम खाते. आल्मंड बोर्ड ऑफ कॅलिफोर्नियाने ‘सौंदर्यासाठी सर्वांगीण दृष्टीकोनाची गरज’ या विषयावर एक चर्चासत्र आयोजित केलं होत. तेव्हा सोहाने हा खुलासा केला. ती पुढे म्हणाली, ”नैसर्गिक सौंदर्य अंतर्गत आरोग्यामधून दिसून येते आणि कोणताही मेकअप त्याची जागा घेऊ शकत नाही. माझी त्वचा नितळ राहावी म्हणून मी नियमितपणे व्यायाम करते. तसेच वारंवार जंक फूड सेवन न करता अनेक फळे, पालेभाजी, लीन मांस व बदाम यांचा आहारात समावेश करते. बदाम हे ई जीवनसत्व आणि अँटी ऑक्सिडंटचे संपन्न स्तोत्र आहे.


या चर्चासत्रामध्ये स्किन एक्स्पर्ट डॉ. गीतिका मित्तल गुप्ता आणि मॅक्स हेल्थकेअरच्या रितिका समाददार यांनी भाग घेतला होता. त्यांनीही फिटनेस व आरोग्यासाठी दररोज मूठभर बदाम खाणे, कसे फायदेशीर आहे; यावर भर दिला.