काळ्या रंगात रंगल्या सोहा अली खान आणि श्रद्धा क...

काळ्या रंगात रंगल्या सोहा अली खान आणि श्रद्धा कपूर (Soha Ali Khan And Shraddha Kapoor Prefer Black Dresses)

लॅक्मे फॅशन वीकच्या मंचावर बॉलिवूडच्या फॅशनवेड्या अभिनेत्री नेहमीच हजेरी लावतात. यंदाच्या या फॅशन शो मध्ये सोहा अली खान, श्रद्धा कपूर, दिया मिर्झा आणि दिव्या खोसला कुमार यांनी वेगवेगळ्या डिझायर्नसचे ड्रेसेस घालून वॉक केला. या चौघींमध्ये एक रंग कॉमन होता. काळा रंग.

काळ्या रंगाच्या ड्रेसेसनी त्यांचे रूप खुलून आले.

सोहा अली खानने मेघा जैनचे कलेक्शन सादर केले. खांदे उघडे टाकलेला पायघोळ गाऊन तिला फारच शोभून दिसला.

सोहा पाठोपाठ दुसरी तरुण अभिनेत्री, श्रद्धा कपूरने काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये हजेरी लावली. एके-ओके या नावाचे अनामिका खन्नाचे कलेक्शन तिला खुलून दिसले. हा आधुनिक ड्रेस लक्षवेधी होता.

दिव्या खोसला कुमारने देखील काळ्या रंगाची कास धरली. संयुक्ता दत्ता निर्मित चमकदार काळी साडी व स्लीवलेस ब्लाऊज तिच्या गोऱ्या रंगावर फारच खुलला.

दिया मिर्झाच्या देहावर अब्राहम आणि ठाकोर यांचा मोठ्या डिझाइनचा, काळ्या रंगाचा गाऊन साधाच होता. पण फॅशनेबल होता.