सोहा अली खान आणि कुणाल खेमूने लेक इनायासोबत महा...

सोहा अली खान आणि कुणाल खेमूने लेक इनायासोबत महाशिवरात्रीच्या निमित्ताने केला रुद्राभिषेक (Soha Ali Khan And Kunal Kemmu With Daughter, Inaaya Does ‘Rudra Abhishek’ On Maha Shivratri)

बॉलिवूड कपल कुणाल खेमू आणि सोहा अली खान वरचेवर आपली लेक इनायाचे क्यूट व्हिडियोज्‌ आणि फोटो सोशल मीडियावर शेयर करत असतात. उभयता आपल्या लेकीला धर्म आणि आपले सण-उत्सव यांचे महत्त्व वेळोवळी सांगत असतात. इनायाला देखील सण साजरे करण्यास आवडतात, असे सोहाने मागे सांगितले होते. आपल्या पुढील पिढीने आपली ही प्रथा सुरू ठेवावी, यासाठी सोहा आणि कुणाल दोघंही आपले सगळे सण साजरे करतात. आजही महाशिवरात्रीच्या निमित्ताने सोहा आणि कुणालने आपल्या कुटुंबासह शिवलिंगास जलाभिषेक केला, ज्याचा व्हिडिओ त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

दरवर्षी कुणाल खेमू महाशिवरात्री दिवशी शिवलिंगास अभिषेक करतो. यावर्षी देखील त्याने रुद्राभिषेक करून त्याचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ लगेचच व्हायरल झाला असून चाहते भरभरून प्रतिक्रिया देत आहेत.

पाहा व्हिडिओ…

व्हिडिओमध्ये कुणाल, सोहा अली खान, आपली लेक इनाया, आई-वडील आणि बहिणीसोबत शंकराची पुजा करताना दिसत आहे. आपल्या कुटुंबियांसोबत कुणालने शिवलिंगास जलाभिषेक केला. इनाया देखील जलाभिषेक करताना दिसत आहे. तसेच पुजा झाल्यानंतर आपल्या आजोबांसह प्रसाद वाटतानाही ती दिसत आहे. छोट्या इनायाच्या क्युटनेसनेही चाहत्यांचं मन जिंकलं आहे. सर्वजण तिचेच कौतुक करत आहेत.

कुणालने पुजेचा व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शुभेच्छा देत त्याने म्हटलंय – ‘सगळ्यांना शांती, आनंद, प्रेम आणि उज्ज्वल भविष्य लाभो अशी मनोकामना. ओम नमः शिवाय…’ कुणालच्या या व्हिडिओला २ लाखांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत.

काश्मीरी पंडित महाशिवरात्रीस हेरथ असे म्हणतात आणि त्यांच्याकडे ही पूजा तीन दिवस केली जाते. दरवर्षी कुणाल पुजेचा व्हिडिओ शेअर करतो. इनायाने ही पुजा पहिल्यांदाच केली नसून याआधीही कधी गायत्री मंत्र बोलताना, तर कधी ओम नामाचं उच्चारण करताना तर कधी सण साजरे करतानाचे इनायाचे व्हिडिओ सोहा आणि कुणाल सोशल मीडियावर पोस्ट करत असतात आणि चाहते त्यास भरभरून पसंती दर्शवित असतात.