संस्कारी अंगुरी भाभीने धीटपणाच्या सर्व मर्यादा ...

संस्कारी अंगुरी भाभीने धीटपणाच्या सर्व मर्यादा ओलांडल्या: वेब सिरीजमध्ये जबरदस्त उन्मादक दृश्ये देऊन चाहत्यांना तापविले (Sober Anguri Bhabhi Has Crossed The Limits Of Boldness : Raised Temperature Of Internet With Hot Bold Scenes In Web Series)

भाभीजी घर पर हैं या मालिकेने प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले होते. या मालिकेत अभिनेत्री शिल्पा शिंदेने अंगूरी भाभी हे पात्र साकारुन प्रेक्षकांची मने जिंकली. तिची ती भूमिका आजही प्रेक्षक विसरले नाहीत. या मालिकेत तिचे पात्र हे एका संस्कारी सून, पत्नी, आणि प्रेमळ शेजारणीचे होते. पण नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एका वेब सिरीजमध्ये शिल्पाने बोल्ड सीन्स देऊन प्रेक्षकांना हैराण केले आहे.

शिल्पाची पौरुषपुर ही वेब सिरीज अलीकडेच प्रदर्शित झाली. या सिरीजमधील तिची भूमिका भाभीजी घर पर है या मालिकेच्या अगदीच विरुद्ध आहे. मालिकेत संस्कारी दिसणारी शिल्पा या सिरीजमध्ये अगदीच हॉट आणि बोल्ड दिसली आहे. 

पौरुषपुर या वेब सिरीजमध्ये शिल्पाने राणी मीरावतीचे पात्र साकारले आहे. त्यात ती राजाची काळजी घेण्यासाठी वेगवेगळ्या राण्या घेऊन येत असते. शिल्पाने या सिरीजमध्ये खूप बोल्ड सीन दिले आहेत. तिचे ते सीन पाहून लोकांना आश्चर्याचा मोठा धक्का बसला आहे.

शिल्पा शिंदे बद्दल बोलायचे झाल्यास तिने 1999 मध्ये टीव्ही इंडस्ट्रीत पदार्पण केले होते. त्यानंतर 2002-2008 दरम्यान ती भाभी या मालिकेतील नकारात्मक भूमिकेमुळे चर्चेत होती. 2001-2003 मध्ये तिने कभी आये ना जुदाई, 2002-2005 मध्ये संजीवनी तसेच 2002 मध्ये आम्रपाली या ऐतिहासिक नाटकात काम केले.

पण शिल्पाला खरी ओळख मिळाली ते भाभी जी घर पर है या मालिकेतील अंगरी भाभी या भूमिकेमुळे. पण 2009 मध्ये निर्मात्यांसोबतच्या काही वादामुळे तिने ही मालिका सोडली. शिल्पाने “छिन्ना आणि शिवानी ” या दोन तेलुगू चित्रपटातही काम केले आहे. पुढे तिने बिग बॉस सीजन 11 चे विजेतेपद पटकावले.