अनन्या पांडेने स्वतःला बाथरूममध्ये बंद करून घेत...

अनन्या पांडेने स्वतःला बाथरूममध्ये बंद करून घेतलं होतं (So That’s Why Once Ananya Pandey Locked Herself in Bathroom, You Will Laugh Knowing The Reason)

हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज चंकी पांडे आणि त्यांची पत्नी भावना पांडे यांची मुलगी अनन्या पांडे ही बॉलिवूडमधील तरुण अभिनेत्रींपैकी एक आहे. अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसलेली अनन्या पांडे तिच्या मनमोहक सौंदर्यामुळे लाखो मनांवर राज्य करत आहे. तिचे बहुतेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकले नसले तरी अनन्याची लोकप्रियता कमी झालेली नाही. आज आम्ही तुम्हाला अनन्याशी संबंधित एक रंजक किस्सा सांगणार आहोत.

अनन्याने आपल्या बॉलिवूड करीअरची सुरुवात सुप्रसिद्ध निर्माता करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर 2’ या चित्रपटातून केली होती. अनन्याच्या या डेब्यू चित्रपटात तिच्यासोबत टायगर श्रॉफ आणि तारा सुतारिया सारखे कलाकार दिसले होते. या चित्रपटानंतर अनन्याकडे अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या आणि तिचा अभिनयातील प्रवास सुरू झाला. अनन्याच्या आयुष्यात एक वेळ अशी आली होती जेव्हा अभिनेत्रीने स्वतःला बाथरूममध्ये कोंडून घेतले होते.

याबाबत अभिनेत्रीने सांगितले होते की, तिला एकदा मोठा प्रोजेक्ट मिळाला होता. पण तो प्रोजेक्ट आपल्याला मिळाला आहे यावर तिला विश्वास बसत नव्हता. त्यामुळे प्रोजेक्ट मिळाल्याची बातमी समजल्यानंतर अभिनेत्रीने काही काळ स्वत:ला बाथरूममध्ये कोंडून घेतले. ‘गहराइयां’ चित्रपटाची ऑफर मिळाल्याने तिला खूप आनंद होता.

काही महिन्यांपूर्वी, अनन्या पांडे शकुन बत्राच्या ‘गहराइयां’ या चित्रपटात दीपिका पादुकोण आणि सिद्धांत चतुर्वेदी यांच्यासोबत दिसली होती. अनन्या पांडेने मुलाखतीत सांगितले होते की शकुन बत्रा खरोखरच माझ्या बकेट लिस्टपैकी एक होते. आणि जेव्हा मला या चित्रपटाची ऑफर मिळाली तेव्हा माझा यावर विश्वास बसला नाही. त्यावेळी मला आनंदाचा धक्का बसला होता, त्यामुळे मी थोडा वेळ स्वत:ला बाथरूममध्ये कोंडून घेतले होते.

अनन्या पांडेच्या म्हणण्यानुसार, तिला हा प्रोजेक्ट मिळाला यावर विश्वास बसत नव्हता. या बातमीनंतर अनन्याने सुमारे 20 मिनिटे स्वत:ला बाथरूममध्ये कोंडून घेतले. या चित्रपटाचा ती एक भाग बनल्याचा तिला खूप आनंद झाला. अभिनेत्रीच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, ती शेवटची साऊथचा सुपरस्टार विजय देवरकोंडासोबत ‘ लायगर’ चित्रपटात दिसली होती, पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकला नाही.