रश्मिका मंदनाला चाहते म्हणत आहेत चलाख, हे आहे क...

रश्मिका मंदनाला चाहते म्हणत आहेत चलाख, हे आहे कारण (So that’s Why Fans Are Calling Rashmika Mandanna Chalu,Know What is The Whole Matter)

पुष्पा फेम दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदनाला नॅशनल क्रश म्हटले जाते. तिची झलक पाहण्यासाठी चाहते आतुर असतात. रश्मिका मंदानाचे नाव साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्रींपैकी एक म्हणून घेतले जाते. तिच्या प्रत्येक लहान-मोठ्या अपडेट्स चाहत्यांना जाणून घ्यायच्या असतात. रश्मिका मंदाना सध्या आपल्या व्यस्त शेड्युलमधून थोडा वेळ काढून मालदीवमध्ये सहलीचा आनंद घेत आहे. पण याचदरम्यान चाहते तिला चलाख म्हणत आहेत.

मालदीवला गेल्यापासून ती तिथले फोटो आपल्या चाहत्यांसाठी शेअर करत असते. रश्मिका मालदीवला आपला कथित बॉयफ्रेंड विजय देवरकोंडासोबत गेल्याचा अंदाज चाहते लावत आहेत.

ती साऊथचा सुपरस्टार विजय देवरकोंडासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा सुरु आहे, पण रश्मिका किंवा विजय देवरकोंडा या दोघांनीही आपल्या नात्याबद्दल काहीही सांगितलेले नाही. दोघांनीही त्यांच्या नात्याच्या बातम्यांवर मौन पाळले आहे.

रश्मिका सतत मालदीवमधले आपले समुद्रातले किंवा पाण्यात खेळतानाचे फोटो शेअर करत असते. ते पाहून चाहते घायाळ होतात. पण तिचे इतके सुंदर फोटो काढतं कोण असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

चाहत्यांच्या म्हणण्यानुसार अभिनेता विजय देवरकोंडासोबत तिच्यासोबतच असून तोच तिचे सुंदर फोटो काढत आहे. त्यामुळेच चाहते रश्मिकाला चलाख आणि लबाड म्हणत आहेत.

अलीकडेच रश्मिकाने धक-धक गर्ल माधुरी दीक्षितसोबत धमाकेदार डान्स केला, तो व्हिडिओ खूप चर्चेत होता. माधुरी दीक्षितसोबत डान्स करण्याचे स्वप्न  पूर्ण झाल्याचे रश्मिकाने सांगितले.  रश्मिकाने नुकतेच ‘गुडबाय’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे, परंतु हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाल दाखवू शकला नाही.