अक्षय कुमार या कारणामुळे हेराफेरी 3 मध्ये दिसणा...

अक्षय कुमार या कारणामुळे हेराफेरी 3 मध्ये दिसणार नाही, स्वत: अभिनेत्याने केला खुलासा (So For This Reason Akshay Kumar Separated From Hera Pheri 3, The Actor Himself Tell The Reason)

गेल्या अनेक दिवसांपासून हेरा फेरी 3 या चित्रपटाची चर्चा सुरु आहे. या चित्रपटात अक्षय कुमारची जागा कार्तिक आर्यनने घेतल्याचे म्हटले जाते. अभिनेता परेश रावल यांनीही हेरा फेरी 3 मध्ये अक्षय कुमार नसून कार्तिक आर्यन दिसणार असल्याचा खुलासा केला होता. अक्षय हेरा फेरीमध्ये दिसणार नाही असे समजताच अक्षयचे चाहते चांगलेच संतापले आहेत. त्यामुळे नो अक्षय नो हेरा फेरी 3 असा ट्रेण्ड सोशल मीडियावर सुरु झाला. मात्र आता अक्षय कुमारनेच तो या चित्रपटात का दिसणार नाही याचा खुलासा केला आहे. सोबतच अभिनेत्याने आपल्या चाहत्यांची माफीही मागितली आहे.

अक्षयला चित्रपटातून काढून टाकण्यात आल्याच्या बातम्या गेले काही दिवस व्हायरल होत होत्या. पण अक्षयने यामागचा खुलासा करत व्हायरल होत असलेल्या अफवांना पूर्णविराम दिला आहे. एका कार्यक्रमादरम्यान अक्षय कुमारला याबद्दल विचारण्यात आले, तेव्हा त्याने त्याला या चित्रपटाची ऑफर आधीच मिळाली होती, परंतु त्याला ती स्क्रिप्ट फारशी आवडली नाही याच कारणामुळे त्याने चित्रपटात काम करण्यास नकार दिल्याचे सांगितले.

अक्षय कुमार म्हणाला, “हेरा फेरी हा माझा करीअरमधला महत्वाचा भाग आहे. इतर अनेकांच्या आठवणी जशा त्या चित्रपटाशी निगडीत आहेत, त्याचप्रमाणे माझ्याही त्या चित्रपटाशी चांगल्या आठवणी आहेत. इतकी वर्षे उलटून गेली पण भाग 3 अजूनही बनला नाही याचे मला वाईट वाटते.”

अक्षय कुमार पुढे म्हणाला, “पण आपण गोष्टींकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याची गरज आहे. हा चित्रपट मला ऑफर झाला होता. मला याबद्दल सांगण्यात आले. पण ज्या पद्धतीने त्याची कथा, पटकथा आकाराला आली, त्यावरून मी अजिबात समाधानी नव्हतो. मला ती नाही आवडली.”

चित्रपटांच्या निवडीबद्दल अक्षय म्हणाला, “लोकांना आता काय पाहायचे आहे त्याबद्दल मी बोलू शकत नाही, परंतु मला ते माझ्या आवडीनुसार दाखवायचे आहे. याच कारणामुळे मी ‘हेरा फेरी 3’पासून दूर झालो. हेरा फेरी हा माझ्या प्रवासाचा एक भाग आहे. त्यामुळेच मला हा चित्रपट करता येत नाही याचे खूप वाईट वाटते.

खिलाडी कुमार पुढे म्हणाला, “मी माझ्या चाहत्यांची माफी मागू इच्छितो की मी हा चित्रपट करू शकत नाही. नो अक्षय नो हेरा फेरी 3 असा लोकांनी ट्रेण्ड सुरु केल्याचे मी पाहिले. पण मी सांगू इच्छितो की तुम्ही जितके दु:खी आहात तितकाच मीही दु:खी आहे.”, “माझ्या चाहत्यांचे वेड काही वेगळेच आहे. ते माझ्यावर खूप प्रेम करतात. त्यांनी मला नेहमीच पाठिंबा दिला आहे. म्हणूनच मी त्यांची माफी मागतो की मी हेरा फेरी 3 चा भाग होऊ शकत नाही.