लाइगरसाठी निर्मात्याची पसंती होती जान्हवी कपूर ...

लाइगरसाठी निर्मात्याची पसंती होती जान्हवी कपूर पण करण जोहरमुळे अनन्याला मिळाला चित्रपट (So Because Of Karan Johar, Ananya Got The Film ‘Liger’, The Makers Wanted To Take Janhvi Kapoor)

लाइगर चित्रपटातील अनन्या पांडे आणि विजय देवरकोंडाची केमिस्ट्री त्यांच्या चाहत्यांनी चांगलीच पसंत पडली आहे. अनन्यासुद्धा या चित्रपटात तिला साऊथचा सुपरस्टार विजयसोबत काम करायला मिळाल्यामुळे स्वत:ला भाग्यवान समजत आहे. पण खरेतर अनन्याला हा चित्रपट निर्माता दिग्दर्शक करण जोहरमुळे मिळाला आहे.

अनन्या पांडेने करीअरच्या सुरुवातीच्या टप्प्यातच इंडस्ट्रीत चांगला जम बसवला आहे. सध्या ती वेगवेगळ्या बिग बजेट चित्रपटांमध्ये काम करत आहे. अनन्या आपल्या आगामी लाइगर चित्रपटासाठी खूप उत्सुक आहे. तिच्या चाहत्यांना सुद्धा ती नव्या चित्रपटात दिसणार असल्यामुळे आनंद झाला आहे.

पण या चित्रपटासाठी अनन्या निर्मात्यांची पहिली पसंती नव्हती तर करण जोहरच्या सांगण्यावरून तिला ‘लाइगर’चे दिग्दर्शक पुरी जगन्नाथ यांनी संपर्क साधला होता हे समजल्यानंतर त्यांना धक्का बसला. खरे तर जगन्नाथ यांनीच एका मुलाखतीत याचा खुलासा केला आहे. चित्रपटाचा निर्माता करण जोहरच्या सल्लानेच अनन्या पांडेला कास्ट केले होते.

जगन्नाथ यांनी जान्हवी कपूरला ‘लाइगर’साठी ऑफर दिली होती, पण तारखांमुळे जान्हवीने या चित्रपटासाठी नकार दिला होता. त्यांनी सांगितले की, जान्हवी ही माझी पहिली पसंती होती. यामागचे कारण म्हणजे मी तिच्या आईचा म्हणजेच स्वर्गीय श्रीदेवीचा खूप मोठा चाहता आहे. त्यामुळे मला या चित्रपटासाठी जान्हवीलाच कास्ट करायचे होते. पण गोष्टी जुळून आल्या नाहीत. त्यानंतर अनन्याला या चित्रपटासाठी फायनल करण्यात आले. जान्हवीने अनेक मुलाखतींमध्ये सांगितले आहे की ती विजय देवरकोंडाची खूप मोठी फॅन आहे.

अनेकदा असे घडते की एखादी अभिनेत्री आणि अभिनेता एकत्र काम करतात आणि चित्रपट संपल्यानंतर त्यांच्यातले नाते किंवा मैत्री संपुष्टात येते. पण अनन्या आणि विजय देवरकोंडा खूप चांगले मित्र बनले आहेत.प्रमोशनदरम्यान दोघांमधील खास बॉण्ड पाहायला मिळाला.

‘लाइोगर’ हा एक अ‍ॅक्शनने भरलेला चित्रपट आहे. ज्यामध्ये अनन्या पांडे व्यतिरिक्त विजय देवरकोंडा, साऊथ सुपरस्टार रम्या कृष्णन आणि प्रसिद्ध बॉक्सर माइक टायसन महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत.