अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांची जोडी ठरली ‘स्म...

अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांची जोडी ठरली ‘स्मार्ट जोडी’ (Smart Jodi Winner Ankita Lokhande And Husband Vicky Jain Won Trophy And 25 Lakh Prize Money)

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम ‘स्मार्ट जोडी’चा महाअंतिम भाग नुकताच संपन्न झाला असून लोकप्रिय अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि विकी जैन (vicky Jain) या जोडीने हा शो जिंकला आहे. शो जिंकल्यानंतर दोघांनाही चमचमणारी ट्रॉफी आणि बक्षीस म्हणून २५ लाख रुपये मिळाले आहेत. दुसरीकडे बलराज सियाल आणि त्यांची पत्नी दीप्ती तुली यांनी दुसरा क्रमांक पटकावला आहे. तर अर्जुन बिजलानी आणि नेहा स्वामी तिसऱ्या स्थानावर आहेत.

लोकप्रिय मालिका ‘पवित्र रिश्ता’ फेम अभिनेत्री अंकिता लोखंडेने तिचा प्रियकर विकी जैन याच्यासोबत लग्नगाठ बांधली. मुंबईत राजेशाही थाटात अंकिता-विकीचा लग्नसोहळा पार पडला. यानंतर आता अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन यांनी स्मार्ट जोडीचे विजेतेपद पटकावले आहे. लग्नानंतर काही महिन्यांनी ते दोघेही स्टार प्लसवरील स्मार्ट जोडी या कार्यक्रमात झळकले होते. नुकतंच या शोच्या विजेत्या जोडीची घोषणा करण्यात आली. त्यात अंकिता लोखंडे आणि विकी जैन हे विजेते ठरले आहेत.

नुकंतच अंकिताने तिच्या इन्स्टाग्रामवर या शोचे काही व्हिडीओ शेअर केले आहेत. ट्रॉफी जिंकल्याबद्दल उत्साहित असलेली अभिनेत्री अंकिता लोखंडे म्हणाली की, “स्मार्ट जोडीचा किताब जिंकून मला खूप आनंद झाला आहे. ही उत्साह, आनंद आणि अस्वस्थता अशी मिश्रित भावना आहे. माझा पती विकीच्या मदतीशिवाय हे शक्य झाले नसते. आम्ही एक होतो आणि एकत्र खेळलो. आम्हाला ट्रॉफी जिंकण्याची गरज होती, कारण हा विश्वास आहे जो आमच्या नात्यात खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे आमचे नाते आणखी घट्ट झाले. आमचे कुटुंब खूप आनंदी आहे आणि आम्ही हा विजय पूर्ण उत्साहात साजरा करू,”

https://www.instagram.com/p/CedC3YflBwV/

यानंतर अंकिताने ई-टाईम्सला मुलाखत दिली. या मुलाखतीत ती म्हणाली, “माझा पती विकी हा चांगला अभिनेता किंवा माझ्यासारखा उत्तम डान्सर नाही. पण तरीही त्याने मला फार छान साथ दिली आहे. तो या कार्यक्रमात फार छान वागायचा. त्यावेळी विकीनेही माझ्याप्रमाणेच स्पर्धात्मक वृत्ती दाखवली. तो माझ्यापेक्षा चांगलं खेळला.”

विकी हा कॅमेऱ्यासमोर लाजतो, असे मला पूर्वी वाटायचे. पण तो एक उत्तम मनोरंजन करणार आहे. आम्ही नेहमी एकत्र चांगले असतो आणि त्यासोबतच आम्ही आमच्या गोष्टी एकमेकांना सांगत असतो. विकीमुळे मी एक वेगळी व्यक्ती बनली आहे. त्याला त्याच्या आयुष्याचा उत्तम समतोल राखता येतो. विकीने माझ्यासाठी जे काही केले, त्यासाठी मला त्याचे आभार मानायचे आहेत”, असेही अंकिता म्हणाली.

दुसरीकडे, विकी जैनने आपल्या विजयाबद्दल बोलताना “स्मार्ट जोडी हा एक साहसी प्रवास आहे. आम्ही एक जोडी म्हणून किती पुढे आलो आहोत हे मी पाहू शकतो. आमच्या उल्लेखनीय प्रवासात या स्मार्ट जोडप्यामुळे आम्ही एकमेकांकडून खूप काही शिकलो आहोत. हे खूप आश्चर्यकारक आहे. आमच्या चाहत्यांनी त्यांच्या अतूट प्रेमाने आणि पाठिंब्याने आम्हाला किती मदत केली. माझ्यासाठी आणि अंकितासाठी हा प्रेमाचा विजय आहे आणि या शोमधून आम्हाला मिळालेले धडे आम्हाला दीर्घ आणि आनंदी मार्गावर घेऊन जातील. त्यामुळे ही ट्रॉफी जिंकल्याने आमच्या नात्याचे महत्त्व आणखी वाढले आहे.” असे मत व्यक्त केले आहे.

‘स्मार्ट जोडी’ हा शो फेब्रुवारी महिन्यात सुरू झाला होता, ज्यामध्ये १० सेलिब्रिटी जोडप्यांचा समावेश होता. या शोमध्ये अंकिता-विकी, अर्जुन बिजलानी-नेहा स्वामी, बलराज-दीप्ती, नील भट्ट-ऐश्वर्या शर्मा, मोनालिसा-विक्रांत आणि भाग्यश्री-हिमालय दासानी या जोड्या एकत्र दिसल्या होत्या. शोमध्ये या सर्व कपल्सची दमदार केमिस्ट्री पाहायला मिळाली होती.