थाय हाय स्लीट ड्रेसची फॅशन करून बॉलिवूड अभिनेत्...

थाय हाय स्लीट ड्रेसची फॅशन करून बॉलिवूड अभिनेत्रींची चढाओढ (Slay The Slit And Wear The Trend: B Town Divas Showing How To Slay In Thigh High Slit Dress)

फॅशन आणि स्टाईल करण्यात बॉलिवूडच्या अभिनेत्रींचा कोणी हात धरू शकत नाही. ग्लॅमरच्या या विश्वात एकापेक्षा एक सरस फॅशन करण्यात या कलावती धन्यता मानत असतात. त्यासाठी मान्यवर फॅशन डिझायनर आणि स्टायलिस्ट यांची त्या मदत घेत असतात.

बॉलिवूडच्या या सुंदरी खासगी जीवनात आणि रुपेरी पडद्यावर देखील आपल्या चित्ताकर्षक फॅशनेबल ड्रेसेसनी लोकांना आकृष्ट करतात. त्याची नक्कल मग तरुण मुली करतात. अन्‌ मार्केटमध्ये त्या फॅशनचा ट्रेंड होऊन बसतो.

आजकाल असाच एक ट्रेंड फारच गाजतो आहे. तो म्हणजे हाय स्लीट ड्रेसचा ट्रेंड. विविध ड्रेसेसच्या स्लीटमुळे मांड्यांचे प्रदर्शन करण्यात या अभिनेत्री धन्यता मानत आहेत. अन्‌ असे ड्रेसेस घालण्याची त्यांच्यामध्ये चढाओढ लागलेली दिसते आहे. पार्टी आणि विविध कार्यक्रमांमध्ये हे अत्याधुनिक ड्रेसेस घालून त्या वावरतात.

या ड्रेसेसचे वैशिष्ट्य असे आहे की, ते बेहद क्लासी, रॉयल आणि मॉडर्न लूक देतात. त्यामध्ये या अभिनेत्री फारच मादक वाटतात.

आता हेच बघा! कियारा अडवाणीने सिल्वर ग्लिटरी लॉन्ग हाय स्लीट स्कर्टवर क्रॉप ब्लाऊज किंवा टॉप घातला आहे. कियाराने अनेकदा स्लीट आऊटफिट्‌स घालून हॉट फोटो शूट करुन घेतले आहे.

जान्हवी कपूरने पांढऱ्या शुभ्र लेस ड्रेसवर ब्लेझर घालून या स्टाईलला वेगळ्याच पातळीवर नेले आहे.

दुसऱ्या एका शूटमध्ये जान्हवीने हॉट रेड गाऊन सोबत ओठ लालभडक रंगवले आहेत. अन्‌ गुडघ्यापर्यंत लांब लाल बूट घातले आहेत. त्यामुळे तिचा हा लूक अतिशय ट्रेंडी व स्टायलिश वाटतो आहे.

अनन्या पांडेचे गुलाबी आणि लाल रफल्ड ड्रेसेस पाहून कोणीही मोहित होईल.

सारा अली खानचे हे मादक रूप फारच लोकप्रिय ठरले होते. कारण ते अतिशय स्टायलिश आहे.

याशिवाय मांड्यांचे प्रदर्शन करणारा साराचा हा हाय स्लीट शॉर्ट ड्रेस देखील फारच हॉट आणि ट्रेंडी आहे.

कंगना रणावतचे हे लॉक अप लुक्स फारच आकृष्ट करणारे ठरले. तिचे हे पर्पल आणि सिल्वर गाऊन बेहद्द स्टायलिश आहेत. या ड्रेसेसमध्ये मांड्या उघड्या टाकून कंगना आपले लूक अधिकच मादक बनवते आहे.