हिवाळ्यात तुमच्या त्वचेस लागू देऊ नका नजर! (Ski...
हिवाळ्यात तुमच्या त्वचेस लागू देऊ नका नजर! (Skin Care In Winter)


ऋतू बदलाबरोबरच त्वचेची निगा (Skin Care In Winter) राखण्याची दिनचर्याही बदलणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून प्रत्येक ऋतूत आपली त्वचा निरोगी आणि चमकदार राहते!
हवामानातील अगदी लहानसा देखील बदल सर्वप्रथम आपल्या त्वचेवर परिणाम करतो, त्यामुळे ऋतू बदलाबरोबरच त्वचेची निगा राखण्याची दिनचर्याही बदलणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून प्रत्येक ऋतूत आपली त्वचा निरोगी आणि चमकदार राहते!

मॉइश्चरायझेशन गरजेचे
हिवाळ्यात त्वचा अधिक कोरडी असते आणि यासाठी त्वचेला अधिक मॉइश्चरायझेशन आवश्यक असते.
तुम्ही उन्हाळ्यात जे मॉइश्चरायजर वापरता, तेच हिवाळ्यात वापरू नका.
ऑइल बेस्ड मॉइश्चरायजर घेणे उत्तम, ज्याचा संरक्षक तेलकट थर तुमच्या त्वचेला कोरडेपणापासून वाचवेल.
जर तुम्हाला मॉइश्चरायझेशनसाठी तेल लावायचे असेल, तर त्वचेवरील रंध्रांना ब्लॉक न करणारे तेल लावा, जसे – अॅव्होकॅडो तेल किंवा बदाम तेल.
अनेकदा आपल्याला वाटतं की हिवाळ्यात सनस्क्रीन लावणं गरजेचं नाही, पण असं करू नका, प्रत्येक ऋतूमध्ये सनस्क्रीन लावणं आवश्यक आहे.
हिवाळ्यात, ओठांची त्वचा देखील खूप कोरडी असते, यासाठी थोडी क्रीम, लिंबाचा रस आणि गुलाबपाण्याचे काही थेंब घ्या आणि रोज रात्री झोपण्यापूर्वी ओठांवर लावा.

आंघोळ करताना या गोष्टींची घ्या काळजी
आंघोळीसाठी खूप गरम पाण्याऐवजी कोमट पाणी वापरा
आंघोळीपूर्वी खोबरेल तेलाने मसाज करा किंवा खोबरेल तेल लावा. बदामाच्या तेलाने देखील मसाज करू शकता.
आंघोळीपूर्वी हळदीच्या क्रीमने मसाज करणे देखील एक चांगला पर्याय आहे. यामुळे त्वचा अधिक कोरडी होण्यापासून वाचते आणि हळदीचे गुणधर्म त्वचेस गुळगुळीत करतात आणि निर्जलित त्वचा देखील बरी करतात.
तुम्ही आंघोळीच्या पाण्यात ग्लिसरीन किंवा टी ट्री ऑइलसारख्या हर्बल ऑइलचे काही थेंब टाकू शकता, यामुळे त्वचेला नैसर्गिक ओलावा राहील.
आंघोळीच्या पाण्यात 2 कप दूध मिसळूनही आंघोळ करू शकता. दुधामध्ये असलेले फॅट आणि लॅक्टिक अॅसिड त्वचेला मुलायम आणि नरम बनवते.
आंघोळीच्या पाण्यात 2 चमचे ऑलिव्ह ऑईल देखील मिसळता येते. कोरड्या त्वचेपासून मुक्त होण्यास हे उपयुक्त आहे.
आंघोळीच्या 15 मिनिटे आधी लिंबाचा रस आणि गुलाबपाणीचे काही थेंब, 1 चमचा ऑलिव्ह ऑईल आणि संत्र्याचा रस, 1 अंड्यातील पिवळा बलक एकत्र मिसळून लावा.
आंघोळीनंतर ताबडतोब बॉडी लोशन, क्रीम किंवा तेल लावा, यामुळे त्वचा दीर्घकाळ हायड्रेट राहील.

फेस मास्क वा जेली वापरताना अशी घ्या काळजी
वोकॅडोचा अर्क आणि ऑलिव्ह ऑइल असलेले पॅक हिवाळ्यात सर्वोत्तम असतात.
दही, ताक आणि मलई एकत्र करून पॅक बनवा आणि त्याने त्वचेस मसाज करा.
ज्या भागात जास्त कोरडेपणा जाणवतो त्या भागावर पेट्रोलियम जेली लावा, कारण ज्यांची त्वचा जास्त कोरडी असेल त्यांच्यासाठी पेट्रोलियम जेली हा चांगला पर्याय आहे.
हिवाळ्यात चेहर्याचे नैसर्गिक तेल कमी करणारे फेस मास्क लावू नका.
हलक्या स्क्रबने चेहरा एक्सफोलिएट करा, यामुळे डेड स्किन निघून चेहरा उजळेल, तसेच मॉइश्चरायजर छिद्रांमध्ये चांगले शोषले जाईल.
त्वचेसाठी काही सौंदर्यप्रसाधने वापरत असाल तर ती सौम्य वापरा. तसेच आंघोळीच्या साबणातही तीव्र रसायनांचा वापर केलेला असतो त्यामुळे त्वचेचे नुकसान होते. त्याऐवजी सौम्य बॉडी वॉश वापरा.
साबणाऐवजी बेसन आणि दह्याची पेस्टही वापरता येईल आणि जर तुम्हाला साबण वापरायचाच असेल तर ज्या साबणात जास्त आर्द्रता असेल किंवा ग्लिसरीन वा नैसर्गिक तेले असतील असा साबण वापरा.

कोरफडाच्या जेलीने मसाज करा, त्यात आरोग्यदायी गुणधर्म देखील आहेत आणि ते अँटिऑक्सिडंट्सनी समृद्ध आहे, ज्यामुळे त्वचेच्या पेशींचे नूतनीकरण होते.
त्वचेचे पोषण करण्यासाठी, ए आणि ई जीवनसत्त्वे असलेली क्रीम लावा.
हिवाळ्यात कोणतेही अल्कोहोलयुक्त उत्पादन वापरणे टाळा.
मड पॅक टाळा. त्याऐवजी ऑइल बेस्ट पॅक आणि क्लीन्सिंग मिल्क वापरा.
रात्री झोपण्यापूर्वी खोबरेल तेल किंवा सूर्यफूलाच्या तेलाने मसाज करा. या तेलांमध्ये नैसर्गिक फॅटी सिड असतात, जे त्वचेला मॉइश्चराइज करतात.

हाता-पायांची अशी करा देखभाल
पाण्यात काम केल्यानंतर हँड क्रीम किंवा लोशन जरूर लावा, कारण हातांची त्वचा खूप पातळ असते आणि तिथे तेलाच्या ग्रंथी कमी असतात.
हातांच्या त्वचेसाठी लिंबाच्या रसात थोडी साखर मिसळून हात स्क्रब करा. त्याच्या सॉफ्ट इफेक्टमुळे हातांची त्वचा कोमल आणि मुलायम बनवून त्वचेवर चमक येते.
हाताच्या कोपरांवरील खडबडीत आणि कोरड्या त्वचेसाठी मध आणि साखरेचा स्क्रब वापरा.
व्हिटॅमिन ई युक्त तेल आणि कोरफड हे हात आणि पायांसाठी सर्वोत्तम मॉइश्चरायजर आहेत. तुम्ही लॅव्हेंडर तेल देखील वापरू शकता. तुमच्या नेहमीच्या मॉइश्चरायजर किंवा क्रीममध्ये काही थेंब टाकून ते वापरा.
मॅनिक्युअर-पेडीक्योर करताना पाण्यात नैसर्गिक तेले टाका.
हातमोजे घाला, जेणेकरून त्वचेचे संरक्षण होईल.
पायात सुती मोजे घाला, त्यामुळे टाचा थंडीत फुटणार नाहीत.
टाचांना भेगा पडू नये म्हणून रात्री 15 मिनिटे पाय कोमट पाण्यात घालून ठेवा. पायाच्या स्क्रॅपरने मृत त्वचा काढा. नंतर टाचांना प्रीकॉटची क्रीम लावा आणि टाचांना मलमपट्टीप्रमाणे मऊ कापड गुंडाळा. रात्रभर राहू द्या. असे एक आठवडा दररोज करा.
हिवाळ्यासाठी खास शूज येतात, त्यांचा वापर करा.
हिवाळ्यात आपण कमी पाणी पितो, त्यामुळे ओलावा कमी होतो. असे न करता त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी आपल्या आहाराची पूर्ण काळजी घ्या. आहारात ताजी फळं आणि भाज्या, फळांचे रस इत्यादींचा अवश्य समावेश करा.. पाणीही भरपूर प्या.
अशा तर्हेने त्वचेची काळजी घेतल्यास हिवाळ्यातही तुमची त्वचा सतेज अन मुलायम राहील. तेव्हा आपल्या त्वचेस कोणाची नजर लागू देऊ नका, अगदी बदलत्या ऋतूचीही