मलायका अरोराच्या चमकदार फोटोंनी केली इंटरनेटवर ...

मलायका अरोराच्या चमकदार फोटोंनी केली इंटरनेटवर धूमधमाल (Sizzling Photos Of Malaika Arora Set Social Media On Fire)

बॉलिवूड अभिनेत्री, मॉडेल, डान्सर, टेलिव्हिजन प्रस्तुतकर्ता आणि व्हीजे तर ती आहेच, शिवाय तिचे नाव भारतातील टॉप आयटम गर्ल्सच्या यादीत समाविष्ट आहे. तुम्ही ओळखलंच असेल ती दुसरी तिसरी कोण नसून मलायका अरोरा आहे. मलायका तिच्या कामासाठी जितकी प्रसिद्ध आहे त्याहून अधिक ती तिच्या फिटनेससाठी प्रसिद्ध आहे. मलायका कुठल्याही प्रकारच्या ड्रेसमध्ये सुंदर आणि हॉट दिसते. फिटनेस फ्रिक मलायकाचे वय वाढत असेल, पण अजूनही ती तिचं यौवनात आहे.

Malaika Arora, Sizzling Photos

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

मलायका अरोराने सोशल मीडियावर तिचे फोटो पोस्ट करण्याची फुरसत की, ते ताबडतोब व्हायरल होतात. तिचे चाहते तिला पाहण्यासाठी वेडे होतात. सध्या मलायका चित्रसृष्टीपासून दूर असली तरी सोशल मीडियावरील तिचे जलवे कमी झालेले नाहीत. सध्या सोशल मीडियावरील मलायकाच्या चमकदार फोटोंनी इंटरनेटवर धूमधमाल केली आहे.

Malaika Arora, Sizzling Photos

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

मलायका अरोराची स्टायलिश मेनका हरिसिंघानीने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर हे फोटोज्‌ पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये मलायकाने गोल्डन रंगाचा ड्रेस घातला आहे, ज्यात तिचं सौंदर्य कमालीचं खूललं आहे. मोकळ्या केसांतील मलायकाचं हे ग्लॅमरस रूप चाहत्यांना वेडावून सोडणारं आहे.

Malaika Arora, Sizzling Photos

फोटो सौजन्य – इंस्टाग्राम

चाहते मलायकाच्या या फोटोंवर भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. प्रत्येक जण तिची प्रशंसा करत आहे. कोणी तिला बार्बी डॉलसारखी दिसतेस असंही म्हणत आहेत.

आपल्या नृत्यकौशल्याने मलायकाने चित्रसृष्टीमध्ये आपली वेगळी ओळख बनवली आहे. तिच्या ‘छैंया-छैंया’, ‘मुन्नी बदनाम’, आणि ‘अनारकली’ सारख्या गाण्यांनी लोकप्रियतेचं शिखर गाठलं आहे. सोशल मीडियावर तर हरेक दिवशी तिच्या नृत्याचे व्हिडिओज पाहिले जातात. याशिवाय मलायकाने इंडियाज बेस्ट डान्सर आणि इंडिया गॉट टॅलेंट सारख्या शोजमध्ये परीक्षक म्हणून काम केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार लवकरच ती एका शोची निर्मिती करणार आहे.