आपल्या मुलांना, वडिलांच्या ऐवजी स्वतःचे आडनाव ल...

आपल्या मुलांना, वडिलांच्या ऐवजी स्वतःचे आडनाव लावणाऱ्या कलावती (Single Mothers of Bollywood and TV, Who Gave Their Surname to Children Instead of Fathers)

चित्रपट आणि टेलिव्हिजन क्षेत्रात घटस्फोटांचे प्रमाण सुरुवातीपासूनच जास्त आढळत आलं आहे. काही ना काही कारणांनी या अभिनेत्रींचे संसार मोडले आहेत. यामध्ये काही तर एकल माता आहेत. त्यांना आपला अभिमान आहे नि मुलांना पण त्यांच्याविषयी आदरभाव आहे.
त्यामुळे त्यांनी काय केलं की, आपल्या मुलांच्या नावामागे वडिलांचे आडनाव लावण्याऐवजी स्वतःचे आडनाव लावले आहे.

नीना गुप्ता:

Single Mothers of Bollywood

फोटो सौजन्य : इंस्टाग्राम

Single Mothers of Bollywood

फोटो सौजन्य : इंस्टाग्राम
बॉलिवूडमधील एकल माता (सिंगल मदर) असा उल्लेख  होतो, तेव्हा नीना गुप्ताचे नाव पहिल्यांदा येते. वेस्ट इंडिजचा क्रिकेट फलंदाज व्हिवियन रिचर्डस सोबत नीना गुप्ताचे विवाहबाह्य संबंध राहिले. त्यांना मुलगी झाली मसाबा . रिचर्डशी संबंध तोडल्यानंतर निनाने एकल माता बनून मसाबाचे संगोपन केले. अन तिला आपले आडनाव दिले.
महिमा चौधरी :

Single Mothers of Bollywood

फोटो सौजन्य : इंस्टाग्राम

Single Mothers of Bollywood

फोटो सौजन्य : इंस्टाग्राम
बॉलिवूडची अभिनेत्री महिमा चौधरी ही देखील अभिमान बाळगणारी एकल माता आहे. तिनं  बॉबी चौधरीशी लग्न केलं त्यांना मुलगी झाली आर्यना . बॉबीशी वेगळे झाल्यावर महिमाने आर्यनाला आपलं आडनाव दिले.
उर्वशी ढोलकिया :

Single Mothers of Bollywood

फोटो सौजन्य : इंस्टाग्राम

Single Mothers of Bollywood

फोटो सौजन्य : इंस्टाग्राम
कोमोलिका या नावाने घराघरात पोहचलेली सुप्रसिध्द टी व्ही. अभिनेत्री उर्वशी ढोलकिया, आपल्या वयाच्या १७व्या  वर्षीच जुळ्या मुलांची आई झाली होती. दुर्दैवाने लग्नानंतर दीड वर्षातच तिचा घटस्फोट झाला. उर्वशीने दुसरे लग्न न करता आपल्या मुलांना वाढविले . सागर आणि क्षितिज अशी या मुलांची नावे असून उर्वशीने त्यांना आपले आडनाव दिले आहे.
श्वेता तिवारी :

Single Mothers of Bollywood

फोटो सौजन्य : इंस्टाग्राम

Single Mothers of Bollywood

फोटो सौजन्य : इंस्टाग्राम
टीव्ही. जगतातील लोकप्रिय तारका श्वेता तिवारीची तर दोन लग्ने झाली. अन ती दोन्ही टिकली नाहीत. राजा चौधरीशी तिन पाहिलं लग्न केलं होतं. त्याच्यापासून तिला पलक ही मुलगी झाली अन दुसरा पती अभिनव कोहली पासून तिला रेयांश  हा मुलगा झाला. पण श्वेता अतिशय खंबीर राहिली अन तिने आपल्या या दोन्ही मुलांना स्वतःचे तिवारी हे आडनाव दिले.