गातेस की खेकसतेस, नेहा कक्कडच्या व्हिडिओवर युजर...

गातेस की खेकसतेस, नेहा कक्कडच्या व्हिडिओवर युजर्सनी विचारला प्रश्न (‘Singing Or Moaning’, Users Are Raising Questions After Watching This Video Of Neha Kakkar)

नेहा कक्कडला बॉलिवूडची सुप्रसिद्ध गायिका म्हणून ओळखले जाते. तिने ‘लंडन ठुमकदा’ ते ‘सनी सनी’ यांसह अनेक हिट गाण्यांना आपला आवाज दिला आहे. नेहाचा प्रवास कसा सुरू झाला हे जवळपास सगळ्यांनाच माहिती आहे. इंडस्ट्रीतील हे स्थान मिळवण्यासाठी नेहाने खूप मेहनत आणि संघर्ष केला आहे. नेहा आपल्या गाण्यांसोबतच लाइव्ह शोद्वारे सुद्धा चाहत्यांचे मनोरंजन करते. अलीकडेच नेहा कक्कडने मुंबईतील उमंग फेस्टमध्ये लाईव्ह परफॉर्म केला. या कार्यक्रमातील तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, तो पाहून लोक नेहाच्या गाण्यावर प्रश्न करत आहेत. ती गात नसून आक्रोश करत आहे, असेही काही लोकांचे म्हणणे आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये नेहा कक्कर ‘मनाली ट्रान्स’ हे प्रसिद्ध गाणे गुणगुणताना दिसत आहे. ते ऐकून उपस्थित प्रेक्षक जल्लोष करत आहेत, पण सोशल मीडियावर मात्र वेगळीच प्रतिक्रिया मिळत आहे. एका युजरने कमेंट मध्ये लिहिले की, “पहिल्यांदा असे वाटले की डास गुणगुणत आहे”. नंतर एका युजरने कमेंट केली, “ती का ओरडत आहे?”

नेहानेसुद्धा आपला एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती स्टेजवर गाताना दिसत आहे. तिला पाहताच चाहत्यांची गर्दी जमते. आणि प्रत्येकजण उत्साहात तिचे गाणे ऐकू लागतात. व्हिडिओ शेअर करताना गायिकेने कॅप्शनमध्ये लिहिले की, “आज मुंबईतील उमंग फेस्टमध्ये खूप मजा आली. ज्यांनी मला प्रेम दिलं त्या सर्वांचे आभार. असे दिसते आहे की #OSanjna सुपरहिट होणार आहे.”

नेहा कक्कडचे नवीन गाणे ‘ओ सजना’ रिलीज झाले आहे. नेहाने या गाण्याला आपला आवाज दिला आहे, तर तनिष्क बागचीने त्या गाण्याला संगीत दिले आहे. या गाण्याचे बोल जानी यांनी लिहिले आहेत. व्हिडिओमध्ये नेहासोबत धनश्री वर्मा आणि प्रियांका शर्मा  आहेत.

नेहा कक्कड 2014 पासून हिमांश कोहलीला डेट करत होती. एवढेच नाही तर दोघांनीही नॅशनल टीव्हीवर ते लवकरच लग्न करणार असल्याचे सांगितले होते. परंतु तीन महिन्यांनी त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्या समोर येऊ लागल्या. यानंतर नेहा चंदिगढमध्ये रोहनप्रीत सिंगला भेटली आणि 24 ऑक्टोबर 2020ला त्यांचे लग्न झाले. आज दोघेही आपल्या वैवाहिक जीवनात खूप आनंदी आहेत.

फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम