अनुप जलोटा व प्रिटी भल्ला या गायकांची गझल सम्रा...

अनुप जलोटा व प्रिटी भल्ला या गायकांची गझल सम्राट जगजित सिंग यांना आदरांजली (Singers Anup Jalota and Preety Bhalla Pays A Special Tribute To Jagjit Singh)

गझल सम्राट जगजित सिंग यांच्या ११ व्या पुण्यतिथी निमित्त भजनसम्राट पद्मश्री अनुप जलोटा व गायिका प्रिटी भल्ला यांनी त्यांची ३ सुपरहिट गाणी सादर करून आदरांजली वाहिली.

जगजीत सिंग यांच्या ‘तुमको देखा तो ये खयाल आया’, ‘तुम इतना जो मुस्कुरा रहे हो’, आणि ‘होठों से छु लो तुम’ या अतीव लोकप्रिय गीतांची पुनर्रचना करून त्यांनी या गाण्यांवर व्हिडिओ तयार केले. ते प्रिटीच्या यु ट्यूब चॅनलवर उपलब्ध करून दिले आहेत. एम ॲन्ड एम म्युझिकतर्फे दीपू पॉल यांनी याची निर्मिती केली आहे.

या प्रसंगी अनुप जलोटा यांनी जगजित सिंग यांच्या आठवणींना उजाळा दिला. “आम्ही घनिष्ट मित्र होतो. ते मला भजन जलोटा व मी त्यांना गझल सिंग म्हणत असू. तो लाख माणूस होता. त्यांच्या मृत्यूआधी मी डेहराडूनला काही दिवस त्यांच्यासोबत राहिलो होतो. ते क्षण अविस्मरणीय आहेत,” असे जलोटा यांनी सांगितले. “जगजित सिंग यांच्या ११ व्या स्मृती दिनानिमित्त त्यांची गाणी गाण्याची व तीही अनुप जलोटा यांच्यासोबत गाण्याची संधी मला मिळाली, हा माझा सन्मान आहे,” अशा भावना प्रिटी भल्ला हिने व्यक्त केल्या.