गायिका नेहा कक्कडचा ३३ वा वाढदिवस : ऐका तिच्या ...

गायिका नेहा कक्कडचा ३३ वा वाढदिवस : ऐका तिच्या श्रीमंतीचे किस्से (Singer Neha Kakkar Turns 33 : She Has A Royal Lifestyle

बॉलिवूडमध्ये ‘शकीरा’ या नावाने लोकप्रिय असलेली सुमधुर आवाजाची गायिका नेहा कक्कड आज आपला ३३ वा वाढदिवस साजरा करते आहे. गायनाबरोबरच सुरेख रुपाच्या या सिंगिंग क्वीनने मोठा चाहतावर्ग मिळवला आहे. नेहाचा जन्म उत्तराखंडातील हृषिकेशचा. ती गरीब घरात जन्मली. त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची होती. म्हणूनच की काय, वयाच्या ४थ्या वर्षीच ती देवळांमध्ये भजन गाऊ लागली. म्हणजे तिच्या घरचे लोक गायला पाठवत असत. या माता का जगरातामध्ये गाऊन तिला ५०० रुपये मिळत. त्याचा तिच्या माता-पित्यांना मोठा आधार वाटे. गरीब परिस्थितीतून वर आलेली नेहा आज आघाडीची गायिका असून राजेशाही थाटाचे जीवन व्यतीत करते आहे.

आपला भाऊ टोनी कक्कड बरोबर नेहा गायनक्षेत्रात नाव काढण्यासाठी मुंबईला आली. इथे तिला बराच संघर्ष करावा लागला. २००८ साली तिचा ‘नेहा द रॉकस्टार’ हा पहिला गाण्याचा आल्बम प्रसिद्ध झाला. त्यामध्ये मीत ब्रदर्स बरोबर नेहाने रोमॅन्टिक गाणी गायली होती.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

‘मीराबाई नॉट आऊट’ या चित्रपटाद्वारे नेहा कक्कडने पार्श्वगायन क्षेत्रात पदार्पण केलं. नंतर यारियां, क्वीन, गब्बर इज बॅक, कपूर ॲन्ड सन्स अशा अनेक चित्रपटातील तिची गाणी गाजली.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

‘इंडियन आयडॉल’ या गाण्याच्या कार्यक्रमाची ती आज परीक्षक आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ११वीत असताना नेहाने याच ‘इंडियन आयडॉल सीझन २’ मध्ये भाग घेतला होता. कठोर परिश्रम आणि मधुर आवाजाच्या जोरावर नेहाने याच कार्यक्रमाच्या चालू सीझनची एक परीक्षक होण्याचा मान पटकावला आहे.

नेहाने गाण्याचे बरेच कार्यक्रम केले आहेत. त्यासाठी तिने जगभर दौरे केले आहेत. परदेशात तिची लोकप्रियता खूप आहे. तिकडे तिचे कार्यक्रम हाऊस फुल्ल होतात. या लोकप्रियतेच्या जोरावर नेहा आज राजेशाही जीवन जगत आहे. तिचे वार्षिक उत्पन्न ३६ कोटी रुपये असल्याचं सांगितलं जातं. एका गाण्यासाठी ती १० लाख तर कार्यक्रमासाठी २० लाख रुपये मानधन घेते, अशीही वंदता आहे. तिला महागड्या मोटारगाड्यांचा शौक असून ऑडी क्यू ७ आणि बीएमडब्लू अशा गाड्या तिच्याकडे आहेत.

नेहाला सेल्फी क्वीन म्हटले जाते. कारण ती स्वतःचे खूप सेल्फी घेते व सोशल मिडियावर टाकते. ते चाहत्यांना आवडतात.

नेहाने गेल्या वर्षी, ऑक्टोबर महिन्यात गायक रोहनप्रीत सिंग याच्याशी लग्न करून सगळ्यांना चकित केलं होतं. नेहा आणि रोहनप्रीत यांची जोडी देखील सोशल मीडियावर लोकप्रिय आहे.’

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम