गायक मिका सिंहची थक्क करणारी संपत्ती आणि मालमत्...

गायक मिका सिंहची थक्क करणारी संपत्ती आणि मालमत्ता ( Singer Micah Singh’s Owns A Huge Property And Networth )

बॉलिवूडमध्ये मिका सिंहच्या आवाजाची जादू सर्वत्र पसरली आहे. त्याची अनेक हिट गाणी प्रेक्षकांच्या अगदी तोंडपाठ असतात. त्यामुळे त्याचे चाहतेसुद्धा असंख्य आहेत. गाण्यांव्यतिरिक्त मिका त्याच्या खासगी जीवनासाठीसुद्धा ओळखला जातो. सध्या मिका त्याच्या स्वंयवरासाठी खूप चर्चेत आहे. ‘स्वयंवर: मीका दी वोटी’ हा मिकाच्या स्वयंवराचा शो सुरु झाला आहे. मिकाकडे चिक्कार पैसा आहे. आज आम्ही तुम्हाला मिकाच्या प्रॉपर्टी आणि पैशांची उलाढाल याबद्दल सांगणार आहोत.

मिकाच्या संपत्तीबद्दल ऐकल्यास भल्या भल्यांच्या पायाखालची जमीन नक्कीच सरकेल. मिळालेल्या माहितीनुसार मिकाची संपत्ती 15 मिलियन डॉलर म्हणजेच 115 कोटी रुपये आहे. मिका प्रति महिना 25 लाख म्हणजेच वर्षाला साधारण 3 कोटी रुपये कमावतो. हा पगार त्याला टी-सिरीजकडून मिऴतो.

करोडो कमावणारा मिका एका अलिशान बंगल्याचा मालक आहे. मुंबईतील अंधेरी येथे त्याचे एक मोठे घर आहे. याशिवाय अजून एक लग्झरी बंगला आहे. या बंगल्याचे नाव त्याने Micah Island असे ठेवले आहे. घरांच्याबाबतीत मिकाकडे 35 कोटी रुपयांपेक्षा अधिक मालमत्ता आहे.

मिकाला महागड्या गाड्यांची खूप आवड आहे. त्यामुळे त्याच्याकडे अनेक महागड्या गाड्या आहेत. त्याच्या कार कलेक्शनमध्ये Porsche Panamera (1.46 कोटी रुपये), Ford Mustang (76 लाख रुपये), Mercedes GLS (1.07 कोटी रुपये), Dodge Challenger SRT Hellcat (52 लाख रुपये), Hummer (80 लाख रुपये), Lamborghini Gallardo (3 कोटी रुपये) आणि  Limousine Version Of Range Rover (3.75 कोटी रुपये) या गाड्यांचा समावेश आहे.

मिकाने बॉलिवूडमध्ये अनेक हिट गाणी दिली हे आपण सर्वजण जाणतो. पण सध्या तो ‘स्वयंवर: मीका दी वोटी’या शो मुऴे पुन्हा चर्चेत आला आहे. हा शो स्टार प्लस वाहिनीवर प्रसारित होत आहे. या शो मधून मिका त्याची जीवनसाथी निवडणार आहे. त्यामुळे मिकाच्या स्वयंवरात भाग घेतलेल्यांपैकी कोणती युवती मिकाचे मन जिंकण्यात यशस्वी होईल हे पाहणे इंटरेस्टींग ठरेल.