गायक-संगीतकार बप्पी लहिरी यांचे दुःखद निधन (Sin...

गायक-संगीतकार बप्पी लहिरी यांचे दुःखद निधन (Singer – Composer Bappi Lahiri Passes Away)

हिंदी चित्रपटसृष्टीला डिस्को संगीताची वेगळी भेट देणारे संगीतकार बप्पी लहिरी यांचे मुंबईत निधन झाले. ते ६९ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर महिन्याभरापासून हॉस्पिटलात इलाज सुरू होते. ऑब्सट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया या दुर्धर आजारात त्यांनी जुहू येथील क्रिटी केअर हॉस्पिटलात शेवटचा श्वास घेतला.

बप्पीदा यांचा जन्म १९५२ साली कलकत्ता येथे झाला होता. त्यांचे खरे नाव अलोकेश लहिरी होते. डिस्को डान्सर, वारदात, नमकहलाल, शराबी, डान्स डान्स, सैलाब आदी चित्रपटांसाठी त्यांनी दिलेली गाणी आजही सिनेरसिकांच्या ओठी आहेत. त्यांनी हिंदी व बंगाली तसेच तामिळ, तेलुगु आणि कन्नड भाषेतही गाणी गायली आहेत. बप्पीदा यांना बॉलिवूडचे पहिले रॉक स्टार सिंगर म्हटले जात होते.

त्यांच्या पश्चात पत्नी चित्रानी आणि मुलगी गायिका रीमा लहिरी बंसल या आहेत.