जगातील 30 सर्वात सुंदर पर्यटन स्थळांत ‘सि...

जगातील 30 सर्वात सुंदर पर्यटन स्थळांत ‘सिंधुदुर्ग’चा समावेश (‘Sindhudurg’ From Konkan Region Is Placed In The List Of World’s Most Beautiful Tourist Places)


दरवर्षीप्रमाणे यंदाही कोंड नेस्ट ट्रॅव्हलर या मॅगझिनने जगातील 30 सर्वात सुंदर पर्यटन स्थळांची यादी जाहीर केली आहे. यंदाच्या वर्षी भेट देण्यासाठी निवडण्यात आलेल्या 30 पर्यटन स्थळांमध्ये भारतातील 9 स्थळांचा समावेश आहे. त्यापैकी महाराष्ट्रातील एकमेव ङ्गसिंधुदुर्गफ जिल्हा आहे. या यादीमध्ये सिंधुदुर्गाची निवड होणे म्हणजेच सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटनाच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय दर्जाचा जिल्हा असल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे.


कोंड नेस्ट ट्रॅव्हलर हे मॅगझिन असून त्याची वेबसाईटही आहे. या मॅगझिनतर्फे दरवर्षी जगातील सुंदर पर्यटन स्थळांची यादी प्रसिद्ध केली जाते. त्यामध्ये या पर्यटन स्थळांची संपूर्ण माहिती दिली जाते. जागतिक स्तरावरील पर्यटनास चालना देण्यासाठी त्यांच्याकडून हा उपक्रम दरवर्षी राबवला जातो. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची माहिती देताना त्यांनी तेथील स्वच्छ सुंदर किनारे, समुद्रातील प्रवाळ, सिंधुदुर्ग किल्ला, त्सुनामी आयलंड यांच्याबरोबरच स्कुबा ड्रायव्हिंगची सोय, समुद्री जीवनाचे दर्शनाची सोयही उपलब्ध असल्याची माहिती दिली आहे. एवढेच नव्हे तर चिपी विमानतळ सुरू झाल्यामुळे सिंधुदुर्गातील पर्यटन सोपे झाल्याने जागतिक पर्यटनाच्या नकाशावर सिंधुदुर्ग पोहचला आहे, अशीही माहिती त्यांनी दिली आहे. ही खरोखरच आपल्यासाठी मोठी अभिमानाची गोष्ट आहे. प