शोकाकुल वातावरणात सिद्धार्थ शुक्लाला अखेरचा निर...
शोकाकुल वातावरणात सिद्धार्थ शुक्लाला अखेरचा निरोप, शहनाज गिलची अवस्था पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी… (Sidharth Shukla’s Last Rites Begin: Shehnaaz Gill Cries Her Heart Out, See Pictures)

काल २ सप्टेंबर रोजी छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याचं हृदयविकाराने निधन झालं. वयाच्या अवघ्या ४० व्या वर्षी अभिनेत्याचं असं अचानक निघून जाणं, यावर अजूनही कोणाचाच विश्वास बसत नाही आहे. त्याच्या निधनानंतर सर्वांनाच धक्का बसला असून चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्ती केली जात आहे. सिद्धार्थच्या निधनाचा सगळ्यात मोठा धक्का हा त्याची जवळची मैत्रिण शेहनाज गिलला बसला आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत शेहनाजचे वडील संतोख सिंह यांनी सिद्धार्थच्या निधनानंतर शेहनाज ही बोलण्याच्या परिस्थितीत नसल्याचे सांगितले. तर दुसरीकडे शेहनाजच्या कुशीत सिद्धार्थने शेवटचा श्वास घेतल्याचे म्हटले जात आहे.

दरम्यान सिद्धार्थच्या अखेरच्या प्रवासास सुरुवात झाली आहे. त्याच्या राहत्या घरीच अंत्यसंस्काराची तयारी केली गेली असून त्याच्या शेवटच्या दर्शनासाठी कुटुंबिय, मित्र व इंटस्ट्रीमधील बरेच सेलिब्रिटी हजर झाले आहेत. अर्जुन बिजलानी पासून अली गोनी, जॅस्मिन भसीन आणि कुटुंबातील नातेवाईक सर्वच हजर आहेत. ब्रह्मकुमारी रितीरिवाजामध्ये अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. मुंबईच्या ओशिवरा स्मशानभुमीमध्ये सिद्धार्थला मुखाग्नी दिला जाणार आहे. तेथे त्याची आई आणि दोन बहिणींसह जवळचे नातेवाईक पोहोचले आहेत.

शहनाज गिलनं देखील सिद्धार्थचं अंतिम दर्शन घेतलं आहे. तिला सिडच्या मृत्यूचा जबरदस्त धक्का बसला आहे. शोकाकूल शहनाजला तिचा भाऊ आधार देत आहे. शहनाजचे अश्रू पाहून चाहत्यांच्याही डोळ्यांत पाणी येत आहे. आपल्या मित्राला अखेरचा निरोप देणं तिच्यासाठी अवघड होत आहे.
फोटो सौजन्य – सोशल मीडिया.