आलियाचे चुंबन घेण्याचा कंटाळा आला म्हणत सिद्धार...

आलियाचे चुंबन घेण्याचा कंटाळा आला म्हणत सिद्धार्थ मल्होत्राने व्यक्त केली या अभिनेत्रीचे चुंबन घेण्याची इच्छा (Sidharth Malhotra Wants To Kiss This Actress, Says I Am Tired Of Kissing Alia)

बॉलिवू़ड इंडस्ट्रीतील देखणा अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राने त्याच्या अभिनय कौशल्याने स्वत:ला सिद्ध केले आहे. सिद्धार्थने आतापर्यंत अनेक अभिनेत्रींसोबत काम केले. पण तरीही त्याची एक इच्छा अजूनही पूर्ण झालेली नाही. ती इच्छा म्हणजे सिद्धार्थला अशा एका अभिनेत्रीला किस करायचे आहे जिच्यासोबत काम करण्यासाठी इतर अभिनेते तडफडतात.

सिद्धार्थने २०१२ मध्ये करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटातून वरुण धवन आणि आलिया भट्टसोबत अभिनयातील करिअरला सुरुवात केली. त्या चित्रपटातील चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे आलिया आणि सिद्धार्थचा किसिंग सीन. पाहणाऱ्याला तो सीन रोमॅण्टिक वाटला तरी सिद्धार्थला मात्र तो सीन कंटाळवाणा वाटला. या सर्व गोष्टी सिद्धार्थने ‘फिल्मफेअर’ला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले.

मुलाखतीदरम्यान, सिद्धार्थ मल्होत्राला इंडस्ट्रीतील कोणत्या अभिनेत्रीला ऑनस्क्रीन किस करायला आवडेल? असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर देताना सिद्धार्थ मल्होत्राने लगेचच दीपिका पदुकोणचे नाव घेतले. अभिनेत्याने सांगितले होते की, दीपिकाचे चुंबन मी आनंदाने घेईन आणि लोकांनाही तिला पाहायला आवडेल. एवढेच नाही तर, सिद्धार्थने मुलाखतीत आलिया भट्टला पडद्यावर किस करून कंटाळा आल्याचे सांगितले.

‘स्टुडंट ऑफ द इयर’ चित्रपटानंतर सिद्धार्थ आणि आलिया भट्ट यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या.ते दोघे एकमेकांना डेट करत असल्याचे म्हटले जात होते. मात्र, नंतर त्यांचा ब्रेकअप झाल्याच्या बातम्या येऊ लागल्या.  आलियाने 14 एप्रिलला रणबीर कपूरसोबत लग्न केले. तर सिद्धार्थ मल्होत्रा ​​कियारा अडवाणीसोबतच्या अफेअरमुळे चर्चेत आहे. चाहत्यांनासुद्धा सिद्धार्थ कियाराची जोडी आवडली आहे.

करण जोहरच्या स्टु़डंट ऑफ द इयर या चित्रपटानंतर सिद्धार्थने ‘हसी तो फसी’, ‘एक व्हिलन’, ‘कपूर अँड सन्स’, ‘इत्तेफाक’, ‘मरजावान’ आणि ‘शेरशाह’ यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये काम केले. लवकरच तो ‘मिशन मजनू’, ‘थँक गॉड’ आणि ‘वॉरियर’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.