या बॉलिवूड सेलिब्रिटी यावर्षी लग्नानंतरची पहिली...
या बॉलिवूड सेलिब्रिटी यावर्षी लग्नानंतरची पहिली होळी करणार साजरी (Sidharth Malhotra Kiara Advani Athiya Shetty Kl-Rahul And Many Celebs Couples Celebrate Their First Holi After Wedding)

होळी हा मस्ती आणि रंगांचा सण आहे. या सणाची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत असतो. बॉलीवूड सेलिब्रिटीसुद्धा गुलाल उधळून रंगांचा हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. २०२२ आणि २०२३ मध्ये अनेक स्टार्सही लग्नाच्या बंधनात बांधले गेले आहेत. अशा परिस्थितीत अनेक सेलेब्स कपल्सही या वर्षीची पहिली होळी साजरी करतील आणि त्यांच्या प्रेमाला प्रेमाने रंगवतील. चला जाणून घेऊया या यादीत कोणत्या जोडप्यांचा समावेश आहे.
सिद्धार्थ मल्होत्रा-कियारा अडवाणी

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांचा यावर्षी ७ फेब्रुवारी २०२३ रोजी जैसलमेरच्या सूर्यगड किल्ल्यावर शाही विवाह झाला. नवविवाहित जोडप्याचीही ही पहिली होळी आहे.
अथिया शेट्टी-केएल राहुल

सुनील शेट्टीची मुलगी आणि अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटर केएल राहुल यांनीही यावर्षी सात फेरे घेतले आहेत. या रोमँटिक जोडप्याची लग्नानंतरची पहिली होळी आहे. अन् अथिया शेट्टी आणि केएल राहुल देखील त्यांच्या पहिल्या होळीबद्दल खूप उत्सुक आहेत. अशा परिस्थितीत दोघेही एकमेकांना रंग लावताना पाहणे रंजक ठरणार आहे.
रणबीर कपूर- आलिया भट्ट

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा विवाह १४ एप्रिल २०२२ रोजी झाला. हे जोडपे एका लाडक्या मुलीचे पालकही झाले आहेत. अशा परिस्थितीत, रणबीर आणि आलियाची लग्नानंतरची पहिली होळी आहे, तर त्यांची लाडकी राहा हिचीही यावर्षीची पहिली होळी आहे.
रिचा चढ्ढा आणि अली फजल

‘फुक्रे’ स्टार्स ऋचा चढ्ढा आणि अली फजल यांनी ४ ऑक्टोबर २०२२ रोजी लग्न केले. दोघांचे लग्न पूर्ण विधींनी पार पडले. त्यांच्या लग्नाचे फोटोही सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. त्याचबरोबर रिचा चढ्ढा आणि अली फजल यांची लग्नानंतरची ही पहिली होळी आहे.