सिद्धार्थ मल्होत्राला या गोष्टीची वाटते सर्वात ...

सिद्धार्थ मल्होत्राला या गोष्टीची वाटते सर्वात जास्त भीती (Sidharth Malhotra Is Most Afraid Of This Thing)

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राने शेरशहा या चित्रपटात निर्भीड पात्र साकारले असले तरी वैयक्तिक आयुष्यात मात्र त्याला एका गोष्टीची भीती वाटते.  सर्वसाधारणपणे ही भीती सर्वांनाच वाटते. आज आम्ही तुम्हाला सिद्धार्थच्या आयुष्यातील भीतीबद्दल सांगणार आहोत.

आजच्या काळातील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक असलेल्या सिद्धार्थने आपल्या करीअरची सुरुवात फॅशन मॉडेल म्हणून केली होती. 2009 मध्ये प्रसारित झालेल्या ‘धरती का वीर योद्धा पृथ्वीराज चौहान’ या मालिकेत त्याने छोटी भूमिका साकारली होती. यानंतर, 2010 मध्ये सिद्धार्थने करण जोहरच्या ‘माय नेम इज खान’ या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले.

2012 मध्ये सिद्धार्थ मल्होत्राने करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटातून मुख्य अभिनेता म्हणून काम करण्यास सुरुवात केली. या चित्रपटानंतर त्याने ‘एक व्हिलन’, ‘हसी तो फसी’, ‘कपूर अँड सन्स’ आणि ‘शेरशाह’ सारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले.

सिद्धार्थ मल्होत्राच्या पालकांबद्दल सांगायचे तर, त्याचे वडील मर्चंट नेव्हीमध्ये कॅप्टन म्हणून काम करत आहेत, तर आई गृहिणी आहे. सिद्धार्थने दिल्लीतूनच आपले शिक्षण पूर्ण केले. सध्या सिद्धार्थ अभिनत्री कियारा अडवाणीला डेट करत असल्याची चर्चा सुरु आहे. अलीकडेच दोघांच्या ब्रेकअपच्या बातम्या येत होत्या, मात्र आता त्या खोट्या असल्याचं सिद्ध झालं आहे. दोघे अजूनही एकमेकांसोबत आहेत.

मध्यंतरी एका मुलाखतीत सिद्धार्थने सांगितले होते की, आपल्या जवळील व्यक्तीला गमवण्याची त्याला खूप भीती वाटते.  ही भीती त्याला लहानपणापासूनच वाटत असल्याचे तो म्हणाला.