सिद्धार्थ मल्होत्रा आधीच्या रिलेशनशिपमधून शिकला...

सिद्धार्थ मल्होत्रा आधीच्या रिलेशनशिपमधून शिकला हा धडा, अभिनेत्याने केला खुसाला (Sidharth Malhotra Has Learned This From The Past Relationship, The Actor Himself Revealed)

बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा ​​सध्या कियारा अडवाणीसोबतच्या अफेअरमुळे खूप चर्चेत आहे. दोघेही पुढच्या वर्षी लग्नबंधनात अडकणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र याबाबत सिद्धार्थ आणि कियाराकडून कोणताही खुलासा झालेला नाही. आज आपण सिद्धार्थ मल्होत्राच्या भूतकाळाबद्दल जाणणार आहोत, ज्यातून तो एक मोठा धडा शिकला होता. याबद्दलचा खुलासा स्वतः सिद्धार्थने केला.

सिद्धार्थ मल्होत्रा ​​कियाराच्या आधी आलिया भट्टसोबत रिलेशनशिपमध्ये होता. पण याबाबत सिद्धार्थ किंवा आलियाने काहीही सांगितले नव्हते. एका मुलाखतीदरम्यान, सिद्धार्थने आपल्या पूर्वीच्या नात्याबद्दल सांगितले. तो म्हणाला की, पाळीव प्राणी कधीही भेट म्हणून देऊ नयेत, हे मी आधीच्या नात्यातून शिकलो.

याआधी सिद्धार्थने करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ शोमध्येही सांगितले होते की, तो त्याच्या एक्सच्या मांजरीला खूप मिस करतो. आलिया भट्टकडे एक मांजर असून आलियाच्या मांजरीचे नाव एडवर्ड असल्याचे आता सर्वांनाच माहित आहे. सध्या सिद्धार्थच्या बोलण्यात अनेकदा त्याची एक्स आणि तिची मांजर येतेच त्यामुळे तो यापूर्वी आलियाला डेट करत असल्याचे युजर्स म्हणत  आहेत.

जेव्हा सिद्धार्थ करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये आलेला तेव्हा करणने त्याला विचारले की EX ची अशी कोणती गोष्ट आहे जी तू मिस करतो? या प्रश्नाचे उत्तर देताना सिद्धार्थने ‘तिची मांजर’ असे उत्तर दिले होते.  आता पुन्हा एकदा नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सिद्धार्थने आलिया भट्टच्या मांजरीबद्दल उल्लेख केला.

एका प्रसिद्ध वेब पोर्टलला दिलेल्या मुलाखतीदरम्यान, रॅपिड फायरमध्ये सिद्धार्थ मल्होत्राला विचारण्यात आलं होतं की, आधीच्या नात्यातून तू काय शिकला आहे? यावर सिद्धार्थ म्हणाला की “मला वाटतं की मी माझ्या आधीच्या नात्यातून पाळीव प्राणी भेटवस्तू म्हणून देऊ नये हे शिकलो.” यानंतर त्याला विचारण्यात आले की, त्याला आलिया भट्टची कोणती गोष्ट चोरायला आवडेल? तर यावर सिद्धार्थ म्हणाला की ‘तिची मांजर…एडवर्ड.’

 सिद्धार्थनेच आलिया भट्टला मांजर भेट म्हणून दिल्याचे चाहत्यांचे म्हणणे आहे. आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​यांनी करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.  या चित्रपटात आलिया आणि सिद्धार्थशिवाय वरुण धवनही होता. मिळालेल्या माहितीनुसार सिद्धार्थ आणि आलियाने शूटिंगदरम्यानच एकमेकांना डेट करायला सुरुवात केली होती. यानंतर दोघांनी ‘कपूर अँड सन्स’ चित्रपटापर्यंत एकमेकांना डेट केले.

फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम