सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणीच्या लग्ना...

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणीच्या लग्नाची तारीख झाली लीक (Sidharth Malhotra And Kiara Advani Will Tie The Knot This Year, Date Leaked)

बॉलिवूड कलाकार त्यांच्या चित्रपटांसोबतच वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असतात. सध्या अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणीच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आले आहे.

सिद्धार्थ ​​आणि कियाराने आपल्या  नात्याबद्दल संकेत दिल्यापासून त्यांचे चाहते आणखीनच उत्सुक झाले आहेत. ते दोघेही लग्न कधी करणार याची आतुरतेने वाट पाहत आहेत. याच दरम्यान दोघांच्या लग्नाबाबत एक नवी माहिती समोर आली आहे.

सध्या सिद्धार्थ ​​आपल्या ‘थँक गॉड’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात सिद्धार्थसोबत अजय देवगणही महत्त्वाच्या भूमिकेत आहे.  एका प्रसिद्ध मीडिया रिपोर्टनुसार, या वर्षी डिसेंबर महिन्यात सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी लग्नबंधनात अडकू शकतात.

डिसेंबरमध्ये लग्न झाल्यानंतर दोघेही मुंबईत रिसेप्शन पार्टी ठेवतील, या पार्टीला बॉलिवूड सेलिब्रिटींना आमंत्रित केले जाणार असल्याचे बोलले जात आहे. काही दिवसांपूर्वी सिद्धार्थ आणि कियारा पुढच्या वर्षी एप्रिल महिन्यात लग्न करणार असल्याचे बोलले जात होते. पण आता मिळालेल्या माहितीनुसार ते दोघे यावर्षी डिसेंबर महिन्यात लग्न करणार आहेत. ही बातमी कळताच दोन्ही कलाकारांचे चाहते खूप खुश झाले आहेत.

सिद्धार्थ आणि कियारा दिवाळीतही वेगवेगळ्या पार्ट्यांना एकत्र उपस्थिती लावून सर्वांचे लक्ष आपल्याकडे आकर्षित करत होते.