सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्युच्या धक्क्याने एक चा...

सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्युच्या धक्क्याने एक चाहती कोमामध्ये (Siddharth Shukla’s Fan In Coma, Shocked By Actor’s Death)

मनोरंजनाच्या चित्रसृष्टीतील अतिशय रुबाबदार आणि हुशार अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या अचानक निधनाने सगळ्यांनाच जबरदस्त धक्का बसला आहे. अजूनही त्याचे कुटुंबिय आणि नातेवाईक स्वतःला सावरू शकलेले नाहीत. सिद्धार्थच्या चाहत्यांनाही त्याच्या जाण्याने खूप मोठा धक्का बसलेला आहे. ते देखील त्याच्या मृत्यूचं सत्य मान्य करण्यास तयार नाहीत. त्यांच्या आवडत्या अभिनेत्याचं एवढ्या कमी वयात या जगातून निघून जाणं, चाहत्यांच्याही जिव्हारी लागलं आहे.

Siddharth Shukla’s Fan In Coma

फोटो सौजन्य – इंस्टाग्राम

कालपर्यंत आपण पाहू शकत असलेला हसता-खेळता चेहरा आजपासून कायमचा नजरेआड झाला आहे. आता आपण त्यास प्रत्यक्ष पाहू शकणार नाही, ही कल्पनाच सहन करणे अशक्य झाले आहे. अशातच सिद्धार्थच्या एका चाहतीने त्याच्या मृत्यूचा इतका जबरदस्त धसका घेतला की ती कोमात गेली आहे. एका व्यक्तीने सिद्धार्थच्या या चाहतीचा फोटो शेअर करून याबाबतची माहिती दिली आहे. या व्यक्तीने तिचा फोटो शेअर करत “लवकर बरी हो” असा संदेश लिहिला आहे.

Siddharth Shukla’s Fan In Coma

फोटो शेअर करणाऱ्या व्यक्तीने अशी माहिती दिली आहे की, “सिद्धार्थ शुक्लाच्या या चाहतीवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले की ती अर्धवट कोमात आहे. अतिरिक्त तणावामुळे तिच्या डोळ्यांतील बुबुळं आणि शरीराचे अवयव काम करत नाहीयेत. मी सर्व चाहत्यांना आणि समर्थकांना शांत राहा असे सांगू इच्छीतो. जास्त विचार करू नका आणि आपले मन इतर गोष्टींकडे वळवा. मला माहित आहे की हे सोपे नाही, परंतु तुम्हाला सिद्धार्थला मुक्त करावे लागेल. प्रार्थना.”

Siddharth Shukla’s Fan In Coma

फोटो सौजन्य – इंस्टाग्राम

या फोटोमध्ये एक मुलगी बेशुद्धावस्थेत दिसत आहे. हा फोटो व्हारयल झाल्यानंतर सगळेच या चाहतीसाठी प्रार्थना करत आहेत. या व्यतिरिक्त अभिनेत्री कविता कौशिकने ट्वीटवरून या चाहतीबाबत दुःख व्यक्त करत सर्वच चाहत्यांना स्वतःची काळजी घेण्यास सांगितले आहे. शिवाय तिने सिद्धार्थ व शेहनाज यांच्या चाहत्यांस कळकळीची विनंती केली आहे की त्यांनी त्यांच्या कुटुंबियांचाही विचार करावयास हवा. तुमच्या अशा वागण्याने सिद्धार्थला देखील त्रास होईल. तेव्हा कृपा करून स्वतःला सांभाळा, असे कविताने म्हटले आहे.